जयंत पाटील लागले कामाला.. भाजपचे नऊ नगरसेवक नाॅट रिचेबल!

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची महापौर निवडणूक चुरशीच्या वळणावर पोचली आहे. येत्या 23 फेब्रुवारीस निवडणूकहोणार असून भाजपकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.
 Jayant Patil .jpg
Jayant Patil .jpg

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची महापौर निवडणूक चुरशीच्या वळणावर पोचली आहे. येत्या 23 फेब्रुवारीस निवडणूक
होणार असून भाजपकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीने महापौरपद खेचण्यासाठी भाजपचे सहा सदस्य गळाला लावले आहेत. 

त्यामुळे या निवडणुकीत संघर्ष पहायला मिळत आहे. यात कोण वरचढ ठरणार हे मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिकेत भाजपने अडीच वर्षापुर्वी पुर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केली. 78 पैकी 41 जागा जिंकून भाजप स्वबळावर सत्तेत आले. अर्थात यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्यांचा भरणा मोठा आहे. शिवाय दोन अपक्ष सदस्यांचाही त्यांना पाठिंबा मिळाल्याने त्यांचे संख्याबळ भक्कम झाले. 2018 मध्ये राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात असताना महापालिका जिंकून भाजपने इतिहास घडवला होता. 

मात्र, आता राज्यातही सत्ता बदल होवून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. महापौर आरक्षणही खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
सध्या बहुमत भाजपकडे असले तरी अंतर्गत नाराजी मोठी आहे. अनेकांना पक्षात घेताना पदे देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण, त्यांना नंतर डावलण्यात
आल्याने नाराजी वाढत गेली.

त्यातच भाजपकडे बहुमत असले तरी ते निसटते आहे. त्यामुळे नाराजांना गळाला लावून राष्ट्रवादीने सत्ता उलथवण्याचा घाट घातला आहे. मुळात महापालिकेत भाजप पहिल्या तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असला तरी भाजप फोडून
बहुमतासाठी आवश्‍यक संख्याबळ खेचण्याचे काम राष्ट्रवादी करत असल्याने त्यांनी महापौरपदावर दावा केला आहे.

भाजपचे बारा नाराज सदस्य फोडण्याचे काम सुरु असताना त्यातील तीन सदस्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्यात भाजप नेते यशस्वी ठरले. मात्र उर्वरित नऊ सदस्य अद्याप नॉटरिचेबल आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजप नेते करत आहेत. मात्र अजून तरी यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांनी अर्ज दाखल केला आहे.

कॉंग्रेसकडून विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर यांनी महापौरपदासाठी तर उमेश पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापौरपदासाठी मैनुद्दीन बागवान आणि दिग्विजय सूर्यवंशी यांचे अर्ज दाखल केले आहेत. तर उपमहापौरपदासाठी सविता मोहिते, स्वाती पारधी यांचे अर्ज दाखल केले आहेत. सांगलीतील महापौर निवडणुकीचा खेळ हा केवळ सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेपुरता मर्यादित नसून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. बहुमताने आलेली सत्ता हातची घालवण्यास भाजप तयार नाही तर नाराजांनी आयती दिलेली संधी घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीची पुन्हा महापालिकेत सत्ता आणण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या महापौर निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
भाजप नेते गाफील 

राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आल्यानंतर महापालिकेत त्या दोघांकडून महापौर निवडीवेळी खेळ होणार याचे इशारे आधीच मिळाले होते. पालकमंत्री जयंत पाटील सावज टप्प्यात आले तर कार्यक्रम करण्यात पटाईत असल्याचे त्यांना खबर होतीच. मात्र तरीदेखील भाजपचे नेते आपले नगरसेवक कब्जात ठेवण्यात गाफील राहिले. मध्यंतरी स्थायी समिती सभापती निवडी वेळीदेखील हा खेळ झाला होता. त्यावेळी थोडक्यात भाजप सत्ता बचावली हा अनुभव असतानादेखील चंद्रकांत पाटील आणि येथील दोन्ही आमदार खासदार सर्व गाफील राहिले अशी चर्चा आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com