गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर; अफवा पसरवू नये! : जयंत पाटील - Jayant Patil said, Ganapatrao Deshmukh's health is stable; Don't spread rumors | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर; अफवा पसरवू नये! : जयंत पाटील

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 जुलै 2021

ज्यांनी मंगळवारी चुकीची माहिती दिली त्यांनाही माझी विनंती की संपूर्ण माहिती घेल्याशिवाय काहीही अफवा पसरवू नयेत.

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganapatrao Deshmukh) यांच्या प्रकृती बद्दल मंगळवारी विविध अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. (Jayant Patil said, Ganapatrao Deshmukh's health is stable; Don't spread rumors) 

हेही वाचा : त्यांनी चक्क पाच लाखांच्या नोटा कचऱ्यात फेकल्या!

पाटील यांनी सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये गणपतराव देशमुख यांनी भेट घेऊन, प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की ''त्यांची प्रकृती स्थिर असून जे कार्यकर्ते सांगोल्याकडे येत होते. त्यांनी माघारी फिरावे असे आवाहनही पाटील यांनी केले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

ज्यांनी मंगळवारी चुकीची माहिती दिली त्यांनाही माझी विनंती की संपूर्ण माहिती घेल्याशिवाय काहीही अफवा पसरवू नयेत. जो पर्यंत पक्षाच्या मध्यवर्ती काऱ्यालयाकडून अधिकृत माहिती मिळत नाही. तो पर्यंत त्या माहितीवर विश्वास ठेउ नये. असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : राज ठाकरेंचा तीन दिवस पुण्यात मुक्काम; पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार

त्याच बरोबत देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख म्हणाले, आबांच्या प्रकृतीबद्दल समाजमाध्यमांमध्ये अफवा पसरवल्या गेल्या होत्या. मात्र, आबांची प्रकृती सध्या स्थिर असून चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नका, असे त्यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख