उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ...

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेली उजनी धरण उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये मायनस 33 टक्क्यांवर गेले होते.
Ujani Dam.jpg
Ujani Dam.jpg

सोलापूर : भिमा खोर्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी उजनी धरणात येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागले आहे. मायनस मध्ये असलेले धरण गुरुवारी सात टक्‍क्‍यांनी प्लसमध्ये आले आहे. धरणातील पाणी पातळी वाढल्याने सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Increase in water for Ujani dam) 

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेली उजनी धरण उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये मायनस 33 टक्क्यांवर गेले होते. मागील दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह भीमा खोऱ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील काही धरणे पुर्णपणे भरल्यामुळे पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी उजनी धरणात येत असल्याने पाणी पातळी वाढ झाली आहे. उजनी धरणात सध्या दौंड येथून पंधरा हजार 384 क्युसेक तर बंडगार्डन येथून 27 हजार 627 क्युसेक विसर्ग येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ सुरू आहे.

दरम्यान, राज्यात मुसळधार पावसाने काल (गुरुवारी) हाहाकार माजवला. रायगड, चिपळून, महाड आशा अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकलेले आहेत. कित्येक भागांमध्ये दरडी कोसळल्याने मार्ग बंद झालेले आहेत. पूरात अडकेलेले नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून, प्रशासनाकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहे. आज (ता. २३ जूलै ) पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. तर,पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिस कंट्रोल रूमकडून मिळाली आहे. 

पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दरड कोसळ्यामुळे आणि अनेक रस्ते पाण्यासाठी असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यास अडणी निर्माण होत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की ''महाडला जायचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, टोळ फाट्याला प्रचंड पाणी असल्याकारणाने आम्ही थांबलेलो आहोत. एन. डी. आर. एफच्या मदतीने बोटीने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महाड शहर पूर्ण पणे पाण्याखाली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मत्री गिरीष महाजन होते. 

लोक आपल्या स्व: रक्षणाकरिता गच्चीवर आणि एसटीच्या टपावर बसली आहेत. महाडमध्ये सर्व गाव पुराने वेढलेली आहेत. महाड वसियांच्या रक्षणा करीता हेलिकॉप्टर येत असल्याने त्यांना सुरक्षीत स्थळी पोहोचवण्या करिता मदत होईल. आम्ही मुंबईला संपर्क करून जीवनावश्यक वस्तू त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, अडचण अशी आहे की त्यांच्यापर्यंत त्या वस्तू कशा पोहोचतील कारण पुरामुळे समन्वयाच्या अडचणी आहेत. आम्ही महाड वासियंच्या मदतीकरिता पुढे कसे जाता येईल अशी धडपड करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com