सामाजिक संदेश देत पदवीधर मतदारांनी साजरा केला नीता ढमालेंचा वाढदिवस 

या वेळी जवळपास तीनशे पदवीधर युवक-युवती आणि पदाधिकारी आरतीला उपस्थित होते.
Graduating voters celebrated Nita Dhamale's birthday by giving a social message
Graduating voters celebrated Nita Dhamale's birthday by giving a social message

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या नीता ढमाले यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करत खुद्द पदवीधर मतदारांनीच त्यांचा वाढदिवस साजरा केल्याचे आज (ता. 26 नोव्हेंबर) पहायला मिळाले. ढमाले या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांना मानणाऱ्या पदवीधर मतदारांनी सामाजिक संदेश देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करत ढमाले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात नीता ढमाले आणि मंदिराचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते देवीची आरती पार पडली. या वेळी जवळपास तीनशे पदवीधर युवक-युवती आणि पदाधिकारी आरतीला उपस्थित होते. कोल्हापूर महापुराच्या वेळी बचाव कार्यात प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या मावळा संघटनेच्या उमेश पोवार आणि सहकाऱ्यांनी या वेळी ढमाले यांना राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

या वेळी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन असल्याने नीता ढमाले आणि पदवीधर मतदारांनी भाई माधवराव बागल यांनी उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्याच्या स्थळी जाऊन पुष्पहार अर्पण केला. या वेळी उपस्थित असणाऱ्या महिला पदवीधर मतदारांनी नीता ढमाले यांना संविधानाची प्रत भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

भारतीय संविधानामुळेच माझ्यासारख्या एका महिलेला पुणे पदवीधरची निवडणूक लढवण्याची संधी मिळत आहे. परंतु गेल्या 70 वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघात एकदाही महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत मतदारांनी मला जे प्रेम दाखवले, त्या जोरावर आपण ही निवडणूक नक्कीच जिंकू, असा मला विश्वास आहे, अशी भावना ढमाले यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com