सातवी नापास उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून पहिल्या बाकावर बसवले! - Former NCP Minister Laxman Dhoble criticizes Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

सातवी नापास उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून पहिल्या बाकावर बसवले!

हुकूम मुलाणी  
रविवार, 4 जुलै 2021

मराठा आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने आंदोलकांसमवेत सोलापूरला जाताना पोलिसांनी अडवल्यावर त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.

मंगळवेढा : ज्यांना 29 टक्के मार्ग पडलेत असे आघाडीतील तीन पक्षाचे नेते एकत्र आल्यावर 90 टक्के होतात आणि पास होतात. म्हणून सत्ता द्या म्हटल्यावर सातवी नापास असलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून पहिल्या बाकावर बसवले. ज्याला 70 टक्के मार्क, विशेष श्रेणी मिळाली आहे, त्यांना विरोधी बाकावर बसविले. सत्तेतील कळत नसल्यामुळे त्यांच्या वागण्याला कंटाळून स्वप्नील लोणकर नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्याचा, आरोप राष्ट्रवादीचे (NCP) माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी केला. (Former NCP Minister Laxman Dhoble criticizes Thackeray government)

हेही वाचा :...म्हणून मी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला

मराठा आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने आंदोलकांसमवेत सोलापूरला जाताना पोलिसांनी अडवल्यावर त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.ते म्हणाले की, 106 आमदार असलेले सत्तेच्या बाहेर आहेत. नापास झालेले सत्तेत असल्यामुळे या तिघांनी मिळून गाभण्या मेंढीची शिकार केलेली आहे आणि आता कॉंग्रेस (Congress) म्हणते धार काढायची कास कुठाय? अशा परिस्थितीत या सगळ्याचा निषेध करत लोकशाही मार्गानी आमचे ऐकून घेणे ही काळाची गरज आहे.

अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या रास्त मागण्या असताना शेवटी तो जमिनी विकून अल्पभूधारक झाला आणि भाजी विकत रस्त्यावर बसला. अशा माणसाला आरक्षण मिळावे, यासाठी आमची ही लढाई आहे. मिसरूड फुटलेल्या तरुण पोरांनी आपले भविष्य घडविण्यासाठी आज हा हक्काचा लढा उभा केला. आरक्षण नाही कुणाच्या बापाचे; आरक्षण आमच्या हक्काचे. संविधानाने दिलेल्या हक्काचा गळा न दाबता मोर्चासाठी दंडेलशाही न करण्याचे आवाहनही माजी मंत्री ढोबळे यांनी यावेळी केले.

हेही वाचा : भापजची खेळी फेल करण्यासाठी ठाकरे सरकारचा हा प्लॅन

यावेळी आमदार समाधान आवताडे, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कौंडुभैरी,संचालक राजेंद्र पाटील, गणेश गावकरे, भास्कर घायाळ, समाधान घायाळ, हर्षद डोरले, मोहन गोसावी, किशोर देशमुख, देवीदास इंगोले, दिंगबर यादव, दिपक सुडके आदींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
Edited By - Amol Jaybhaye   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख