Former MP Dhananjay Mahadik criticizes Satej Patil without naming him
Former MP Dhananjay Mahadik criticizes Satej Patil without naming him

महाडिकांना संपविण्याची भाषा करण्याइतकी कसली घमेंड आली आहे : धनंजय महाडिकांचा विरोधकांना टोला

काय आहे गोकुळमध्ये? ज्यासाठी इतके कारस्थान केले जात आहे.

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : ‘‘महाडिक मुक्त जिल्हा करण्याची भाषा काही जण करीत आहेत. पण, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आतापर्यंत पाच निवडणुका लढविल्या. त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो. म्हणजे काय मी संपलो. लढाईच करायची असेल तर तत्त्वांची करा, विचारांची करा. महाडिकांना संपविण्याची भाषा करण्याइतकी कसली घमेंड आली आहे,’’ अशा शब्दांत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता निशाना साधला.

कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीचा गडहिंग्लजच्या गांधीनगरातील गणेश सांस्कृतिक भवनमध्ये मेळावा झाला. त्यावेळी  माजी खासदार महाडिक यांनी विरोधकांवर टीका केली. या वेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, माजी मंत्री भरमू पाटील, गोकुळचे संचालक रणजित पाटील, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महाडिक म्हणाले, ‘‘दुष्काळ, अतिवृष्टीने राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण, कोल्हापुरात एकही आत्महत्या झाली नाही. कारण, गोकुळ आणि त्या माध्यमातून मिळणारा आर्थिक आधार आहे. गोकुळची ही निवडणूक सत्य विरुद्ध असत्य, पारदर्शकता विरुद्ध भ्रष्टाचार, नीती विरुद्ध अनीती अशी आहे. त्यामुळे निवडणूक फार लाईटली घेऊ नका.''

''खरं तर निवडणूकच लागायला नको होती, इतका चांगला कारभार केला आहे. पण, मंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन कोरोनाच्या असामान्य परिस्थितीत आपल्यावर निवडणूक लादली आहे. काय आहे गोकुळमध्ये? ज्यासाठी इतके कारस्थान केले जात आहे,’’ असा सवालही धनंजय महाडिक यांनी विरोधकांना विचारला आहे.

घाटगे म्हणाले, ‘‘गोकुळचा प्रपंच गावागावात-वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या माणसाचा आहे. आतापर्यंत तो अत्यंत जबाबदारीने सांभाळला आहे. त्यामध्ये तण वाढू देऊ नका. त्याचा बंदोबस्त करुन पिकांचे रक्षण करा.’’ 

रणजित पाटील म्हणाले, ‘‘खासगी दूध संघ अनेक आले. पण, टिकले नाहीत. कारण, गोकुळ प्रत्येकाच्या संसारात पोचला आहे. त्याने सामान्य माणूस उभा केला आहे.’’

कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन सत्ताधारी आघाडीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे  कुपेकर यांनी सांगितले.

या वेळी भरमू पाटील, उमेदवार प्रकाश चव्हाण, संजय बटकडली, माजी संचालक बाळासाहेब पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुभाष चोथे, मार्तंड जरळी यांचीही भाषणे या वेळी झाली. उमेदवार सदानंद हत्तरकी, भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, बाबूराव मदकरी, किरण पाटील, रमेश आरबोळे, भैरू पाटील, कृष्णराव वाईंगडे, उदय देसाई, चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com