पोस्टमनला मॅनेज करून शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसा संजय शिंदेंनी गायब केल्या!

शिंदे यांच्या गैरव्यवहारची व शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकीची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी केला आहे.
 Narayan Patil criticizes MLA Sanjay Shinde .jpg
Narayan Patil criticizes MLA Sanjay Shinde .jpg

करमाळा : जेऊर ग्रामपंचायतीचा आवहाल अधिकारी मॅनेज करून केला आहे. थोड्याच दिवसात यातील सत्य काय ते बाहेर येईलच, पण आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांनी म्हैसगांव कारखान्याच्या माध्यमातून नुसता 22 कोटींचा गैरव्यवहार केला नाही तर त्यांनी शेकडो कोटींचा गैरव्यवहार करून हे पुढे आले आहेत. शिंदे यांच्या गैरव्यवहारची व शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकीची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी आमदार नारायण (Former MLA Narayan Patil) पाटील यांनी केला आहे. ते जेऊर( ता. करमाळा ) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Former MLA Narayan Patil criticizes MLA Sanjay Shinde)

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जि. प. सदस्या सविताराजे भोसले, बिबिषण आवटे, सभापती गहिनीनाथ ननवरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, रोपळ्याचे सरपंच तात्या गोडगे, देवानंद बागल, उपसभापती दत्ता सरडे, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, अजित तळेकर उपस्थित होते. याबाबत पुढे बोलताना माजी  पाटील म्हणाले, आमदार शिंदे यांनी चुकीच्या पध्दतीने जेऊर ग्रामपंचायतीत लक्ष घालून अधिका-यावर दबाव आणुन रिपोर्ट तयार करून घेतला. सात वर्षांचे दप्तर एका अधिका-यांने 2 तासात तपासले. हे कसे शक्य आहे?

शिवसेना पक्ष माझ्या पाठीशी आहे. याची सर्व उत्तरे लवकरच सर्वांना मिळतील. मात्र, आमदार संजय शिंदे यांच्यावर एवढे आरोप होत आहेत. त्यांच्यावर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना ते गप्प का आहेत. तर त्यांनी पुढे येऊन याचा खुलासा करायला पाहिजे, ज्या आर्थी खुलास केला जात नाही त्या आर्थि लोकांनी काय ते समजून घ्यावे. 

आमदार शिंदेनी दीड हजार शेतकऱ्यांना त्यांनी फसवण्याचे काम केले आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी नोटिसाच पोचू दिल्या नाहीत. पोस्टमनकडे आलेल्या नोटीसा मॅनेज करून नोटिसा संजय शिंदेच्या कार्यकर्त्यांनी गायब केल्या. ज्या शेतकऱ्यांना नोटिसा आल्या आहेत. ती शेतकरी तक्रारी करत आहेत, तरीही हे शेतकऱ्यांच्या नावावरचे कर्ज भरले जात नाही.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारला असता माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की बंडगर हे आमचे नाहीतच. ते माझ्याकडून फुटून बागल गटात जाऊन सभापती झाले आहेत आणि हे आपल्या सर्वांना माहितीच आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com