इतकी वर्ष शेनी वाळवायला गेला होतात काय! 

इतके वर्षे काय करत होतात. उट सूट केंद्र सरकार वर टीका करायची. जर तुम्हाला हेच करायचे असेल तर राज्य सरकार केंद्राला चालवायला द्या तुमची काय गरज आहे.
 Sadabhau Khot, Ashok Chavan, Nawab Malik .jpg
Sadabhau Khot, Ashok Chavan, Nawab Malik .jpg

सांगली : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण हवे असेल तर मराठा समाजामध्ये जन्माला न आलेला मुख्यमंत्री पाहिजे. तेव्हाच मराठा समाजाला न्याय मिळेल. असे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी केले. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी खोत म्हणाले, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आमदार, खासदारांनी राजीनामा द्यावा, त्यांनी सांगावे की आम्ही सत्तेवर राहणार नाही. मी पण राजीनामा द्यायला तयार आहे. तशी तारीख जाहीर करावी. बघू कुणाला किती मराठा समाजाचा पुळका आहे. असे जाहीर आवाहान खोत यांनी केले. (Former Minister Sadabhau Khot criticizes the state government)

मराठा समाजाचा विश्वासघात महाविकास आघाडी सकारने केला आहे. महाविकास आघाडी बेजबाबदार पणाने वागल्यामुळे आरक्षण टिकू शकले नाही. अनेक वर्षांपासून आरक्षणची मागणी आहे. त्याकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. मराठा समाजातील जेष्ठ नेते होते. त्यावेळी का आरक्षण देऊ शकले नाहीत, असा सवाल खोत यांनी केला. मराठा नेते राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे बोलत असतात. इतकी वर्ष शेनी वाळवायला गेला होतात काय. इतके वर्षे काय करत होतात. उट सूट केंद्र सरकार वर टीका करायची. जर तुम्हाला हेच करायचे असेल तर राज्य सरकार केंद्राला चालवायला द्या तुमची काय गरज आहे, अशी खोचक टीका खोत यांनी केली. 

येत्या 10 तारखेला रयत क्रांती संघटने मार्फत राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. आपापल्या अंगणात मराठा आंदोलन करतील. 'मराठा पोरांचे आरक्षण बांधले काठीला आणि सरकार गेले काशीला' हे वाक्य घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम तुमचे हेलिकॉप्टर बांधावर उतरावा. आणि फोटो सेशन करा जेणेकरून निवडणुकीत तुम्हाला दाखवता येईल. या सरकारची अवस्था 'आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातय' अशी झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान बघायला वेळ नाही. कोरोनाच्या नावाने सरकार हिंडत आहे. मास्क लावा सोशल डिस्टंसिंग पाळा आणि घरात बसा आणि स्मशानभूमीत जावा एवढाच कार्यक्रम या सरकारचा आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.  

उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, अन्य मार्गाने मराठा समाजाचे नुकसान भरून काढतो. असे म्हणत असतील तर त्यांचे स्वागत करतो. राज्यात एकही आत्महत्या मराठा समाजामध्ये होणार नाही, त्यासाठी तरुणांना रोजगार द्या, हे काय करतात. गेल्या अनेक वर्षात काय दिवे लावले आहेत, अशी खोचक टीका खोत यांनी केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com