कॉंग्रेसला विचारात न घेता मुख्यमंत्र्यांनी नामांतराचा निर्णय घेतला काय?: सचिन सावंत म्हणतात... 

छत्रपती संभाजीराजांचा वापर राजकरणासाठी करू नये.
Did the Chief Minister decide to rename Aurangabad without considering the Congress ?: Sachin Sawant says
Did the Chief Minister decide to rename Aurangabad without considering the Congress ?: Sachin Sawant says

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजांचा वापर राजकरणासाठी करू नये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरूजी आणि सावकर यांचा उदोऽऽउदोऽऽऽ आणि छत्रपती संभाजीराजांचा जयजयकार एकत्रित होऊ शकत नाही. भाजप हा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि मनुवादी विचाराचा असून गोळवलकर गुरुजींनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजीराजेंविषयी अहवेलना करणारे लिखाण केले आहे. त्यांच्या पुस्तकाचे दहन झाले पाहिजे, अशी अपेक्षा कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज येथे व्यक्त केली. 

कोल्हापूर दौऱ्यावर असलेले प्रवक्ते सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले,""छत्रपती संभाजीराजे हे संस्कृत पंडित होते. त्यांची अहवेलना एकेरी शब्दासह अक्षेपाहृ लिखानातून गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकातून झाली आहे. त्यांच्या पुस्तकाचे दहन झाले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहीर माफी मागितली पाहिजे. त्यांच्या या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात बोलणारे गोळवलकर आणि सावकर हे भाजप आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचे आदर्श आहेत. त्यांनी ते तपासून घ्यावेत. मनुवादी भूमिकेच्या या भाजपने छत्रपती संभाजीराजांचा वापर राजकरणासाठी करू नये.'' 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला विचारात न घेता नामांतराचा निर्णय घेतला आहे काय? यावर प्रवक्ते सावंत म्हणाले, "तीनही पक्षांचे सरकार आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. निवडणूक आली की नामांताराचे प्रश्‍न पुढे येतात. आघाडी सरकारमध्ये समन्वय समिती आहे, मिळून निर्णय होतात. यामुळे सरकारला कोणताही धोका नाही.'' 

भाजप मनुवादी पक्ष

भाजप हा मनुवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसारणीवर चालतो. ती विचारसारणी हिटलर आणि मुसोलिनकडूनच आली आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांचे, सर्वसमान्यांच्या हिताचे कायदे होत नाहीत. मनुवादी विचारातून संघाची जडणघडण झाली आहे. तीच विचारसारणी आता लोकांवर लादली जात आहे. त्यामुळेच लोकहिताचे नव्हे; तर मूठभर उद्योजकांच्या हिताचे कायदे होत असल्याचीही टीका प्रवक्ते सावंत यांनी केली. 

शेतकऱ्यांची वज्रमूठ मोदी सरकारचा अहंकार उतरवेल 

प्रवक्ते सावंत म्हणाले,"आमदार चंद्रकांत पाटील यांनी मूठभर शेतकऱ्यांसाठी कायदे बदलायचे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला. आता हीच मूठ वज्रमुठ झाली आहे, तीच मोदी सरकारचा अहंकार उतरविणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी हीच मनुवादी वृत्ती पुढे आली होती. करवीर नगरीतसुद्धा राजर्षी शाहू महाराजांना याचा अनुभव आला होता. त्यामुळे अशा मनुवादी विचारसारणीचा आम्ही निषेध करतो.'' 

प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत योग पद्धतीने निवड

महापालिका निवडणुकीचे नियोजन स्थानिक नेत्यांकडून होईल. महाराष्ट्राचे प्रभारी यांच्याकडे सर्व सूत्रे आहेत. तसेच, प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत योग्य पद्धतीने निवड सुरू आहे. राष्ट्रीय नेते याबाबत विचार करूनच निर्णय घेतील. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावेळीही नाराजी वगैरे मुद्दे येत होते. मात्र, असा कोणताही प्रकार नाही., असेही प्रवक्ते सावंत यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com