Bharat Bhalke.jpg
Bharat Bhalke.jpg

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची कोंडी 'या' समाजाने दिला इशारा

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरु आहे.

पंढरपूर : (जि. सोलापूर) राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यावरुन विविध इच्छूकांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. त्यातच आता या जागेवर धनगर समाजाचा उमेदवार रिंगणात असल्याने आता प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. 
 
येथील होळकरवाड्यात धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यामध्ये निवडणूक लढवण्यावर एकमत झाले. कोणत्याही परिस्थितीत धनगर समाज ही निवडणूक लढवणार अशी भूमिका समाजाच्या बैठकीत घेण्यात आली आहे. मतदार संघात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. समाजाच्या मतावर आता पर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. आता पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा धगरन समाजाचा उमेदवार रिंगणात असेल असा सूचक इशारा या बैठकीतून देण्यात, आल्याचे धनगर समाज आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक प्रा. सुभाष मस्के यांनी सांगितले. 
 

धनगर समाजाने उमेदवारीची मागणी केल्याने महाविकास आघाडीपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे. येथील पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचा कस लागणार आहे.

हे ही वाचा...

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी इच्छूक शिवसेना नेत्याने घेतली शरद पवारांची भेट 

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत विद्यमान सरकार सकारात्मक आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी स्वतः या योजनेबाबत चर्चा करून आवश्‍यक ती कार्यवाही करण्यासाठी सूचना करू, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे, अशी माहिती शिवसेना नेत्या शैला गोडसे यांनी सांगितली. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधीची तरतूद व प्रत्यक्ष कामाला तत्काळ सुरुवात करावी यासाठी शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील येथील निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली. मंगळवेढा तालुक्‍यातील दुष्काळी 35 गावांना वरदान ठरणारी उपसा सिंचन योजना गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. 

दुष्काळी 35 गावांतील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या उपसा सिंचन योजनेसाठी दोन टीएमसी पाणी उपलब्ध झाले असून 530 कोटींच्या खर्चाला 2014 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा, उपोषण, आंदोलन करूनही ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडली आहे. 

येत्या काही दिवसांत पंढरपूर मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना नेत्या गोडसे याही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आता उपसा सिंचन योजना, पाणी प्रश्नावर थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान, मंगळवेढा शहरालगतच्या बसवेश्‍वर स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लागावा, यासाठीही शैला गोडसे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या स्मारकाच्या कामासाठी अजित पवारांनी तरतूद केली आहे. तत्पूर्वी गोडसे यांनी मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्यासह सोलापुरात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची याच प्रश्‍नासंदर्भात भेट घेत निधीची मागणी केली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com