दापोली मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; राष्ट्रवादी, मनसे आघाडीवर

दापोली नगरपंचायतीच्या कारभाराबाबत राष्ट्रवादी, मनसे व शिवसेनेचा दळवी गट आक्रमक झाला असून, आज मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत एक निवेदन दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांना देण्यात आले. या निवेदनात दापोली नगरपंचायतीचे अभियंता सुनील सावके यांना नगरपंचायतीमध्ये अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सत्ताधारी सदस्यांना हाताशी धरून सावके यांना संख्याबळाच्या जोरावर नगरपंचायतीच्या सभेत ठराव करून पुन्हा कामावर हजर करून घेतले आहे.
MNS and NCP
MNS and NCP

दाभोळ  : दापोली नगरपंचायत क्षेत्रामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून बेकायदेशीर कामे व बेकायदेशीर ठराव करून शहरातील वातावरण बिघडविण्याचे काम दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा 28 सप्टेंबरपासून सर्व दापोलीकर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

दापोली नगरपंचायतीच्या कारभाराबाबत राष्ट्रवादी, मनसे व शिवसेनेचा दळवी गट आक्रमक झाला असून, आज मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत एक निवेदन दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांना देण्यात आले. या निवेदनात दापोली नगरपंचायतीचे अभियंता सुनील सावके यांना नगरपंचायतीमध्ये अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सत्ताधारी सदस्यांना हाताशी धरून सावके यांना संख्याबळाच्या जोरावर नगरपंचायतीच्या सभेत ठराव करून पुन्हा कामावर हजर करून घेतले आहे.

दापोली शहरामध्ये नगरपंचायतीच्या मालकीची डंपिंग ग्राउंडसाठी ६ एकर जागा असताना व डीपी प्लॅनमध्ये डंपिंग ग्राउंडकडे जाण्यासाठी प्रस्तावित रस्ता असताना त्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाची तिजोरी रिकामी असतानाही सत्ताधारी व मुख्याधिकारी यांनी करोडो रुपयांची जागा खरेदी करण्याचा ठराव काल (ता. २१) झालेल्या सभेत मंजूर केला.

पथविक्रेता धोरण राबविताना जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकी असलेल्या जमिनीत त्यांची परवानगी न घेता बेकायदेशीर खोके उभारण्यात आले आहेत. त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याविरोधात या प्रकरणामध्ये कारवाई न झाल्यास 28 सप्टेंबरपासून दापोलीकर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. दापोलीचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन जाधव, रवींद्र क्षीरसागर, खालिद रखांगे, नम्रता शिगवण, मनविसेचे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, मनसेचे शहराध्यक्ष राकेश माळी, साईराज देसाई, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन मयेकर, मंगेश शिंदे, ऋषिकेश गुजर यांच्यासह अन्य निवेदन देताना उपस्थित होते.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com