The coordinator of Marathi Kranti Morcha will meet Union Law Minister Kiran Rijiu  .jpg
The coordinator of Marathi Kranti Morcha will meet Union Law Minister Kiran Rijiu .jpg

फडणवीसांनी दिल्लीत पोहोचविला सोलापुरातील मराठ्यांचा आवाज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मराठा समाज एकवटला.

सोलापूर : सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाचा (Marathi Kranti Morcha)'आक्रोश मोर्चा' यशस्वी झाल्यानंतर माजी नगरसेवक अनंत जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय राम जाधव, समन्वयक किरण पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत भेट घेतली होती. 102 वी घटना दुरुस्ती संदर्भात केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे. मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा आणि केंद्रीय कायदामंत्री यांची बैठकीसाठी वेळ घेऊन द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी सकारात्मकपणे घेत केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांची वेळ घेऊन दिली आहे. बुधवारी (ता. 4 ऑगस्ट ) दिल्ली येथे सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत बैठक होणार आहे. (The coordinator of Marathi Kranti Morcha will meet Union Law Minister Kiran Rijiu) 

या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक नरेंद्र पाटील, सोलापूरचे माजी नगरसेवक अनंत जाधव, सोलापूरच्या मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, समन्वयक किरण पवार हे उपस्थित राहणार आहेत. फडणवीस सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले होते. त्यांनी दिलेले हे आरक्षण उच्च न्यायालय टिकले. सर्वोच्च न्यायालयात मात्र, आरक्षणाला स्थगिती मिळाली. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर मराठा आरक्षणाला खीळ बसली, असा आरोप क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले त्यावेळेस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग होता. त्यामुळे राज्यातील मराठा समाज शांत बसला. मराठा समाजाची ही खदखद जून अखेरीस व जुलैच्या सुरुवातीपासूनच बाहेर पडण्यास सुरुवात झाली.  

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मराठा समाज एकवटला. त्यानंतर राज्यातील मराठा समाजाचा पहिला आक्रोश मोर्चा हा सोलापुरात निघाला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने 4 जुलैला आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राज्यातील कोरोनाचे संकट कायम असल्याचे कारण देत पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी नाकारली. 

मोर्चा रोखण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असताना देखील सोलापूरचे माजी पालकमंत्री व भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी हा मोर्चा यशस्वी केला. आक्रोश मोर्चाची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. सोलापुरातील मराठा समाजाचा आवाज केंद्र सरकारच्या दरबारी पोहोचण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com