अपघातग्रस्त तरुणांसाठी मुख्यमंत्री देवासारखे आले धावून! - Chief Minister Uddhav Thackeray helped the injured youth | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

अपघातग्रस्त तरुणांसाठी मुख्यमंत्री देवासारखे आले धावून!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे हे स्वतः मुंबईहून गाडी चालवत महापुजेसाठी आले आहेत.

मुंबई : विठ्ठलाच्या महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक सोमवारी पंढरपुरला जात असताना. करकंब जवळ २ बाईक स्वारांचा भीषण अपघात झाल्याचे मुख्यमंत्र्यांना कळाले. (Chief Minister Uddhav Thackeray helped the injured youth) 

त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच स्वतःच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांची गाडी त्यांच्या मदतीसाठी देण्याचे आदेश दिले. तसेच पंढरपुरात दाखल झाल्यावर त्यांनी स्वतः त्या तरुणांची विचारपूस केली. वेळीच उपचारासाठी दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर इथे रवाना करण्यात आले आहे. 

हेही वाचा : मी तोंड उघडल्यास महागात पडेल! के. सी. पाडवींचा फडणवीसांना इशारा

मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेतल तरुणांची मदत केली. त्यामुळे पंढरपूर परिसरात ऐसा संवेदनशील मुख्यमंत्री होणे नाही. अशी चर्चा रंगली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकरही होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे हे स्वतः मुंबईहून गाडी चालवत महापुजेसाठी आले आहेत. गेल्यावर्षीही ते गाडी चालवत आले होते. प्रथेप्रमाणे त्यांनी मंगळवारी (ता. २० जुलै) पहाटे २.१५ वाजता सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.

हेही वाचा : सरकार पडेल असे रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे.  माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख