सातारा जिल्हा बँकेबाबत पृथ्वीराज चव्हाण, शंभूराज देसाई यांचे सूचक वक्तव्य

सातारा जिल्हा बॅंकेसाठी प्रत्येक पक्षाने बैठक घ्यायला सुरुवात केली आहे.
 Satara District Bank elections  .jpg
Satara District Bank elections .jpg

कऱ्हाड : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara District Bank elections) प्रत्येक पक्ष आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. काँग्रेसही त्यात मागे नाही. मात्र, अजुन त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. लवकरच त्याचा निर्णय होईल, असे सुचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात केले. (Prithviraj Chavan said regarding Satara District Bank elections)  

कऱ्हाडमधील एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. गृराज्यमंत्री शंभुराज देसाई, कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, मनोहर शिंदे आदी उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, सातारा जिल्हा बॅंकेसाठी प्रत्येक पक्षाने बैठक घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये रनणितीही आखली जात आहे. आम्ही कॉंग्रेस म्हणुनही बैठका घेत आहोत. अनेकजण इच्छुक आहेत. 

निवडणूक महाविकास आघाडीतून, की पक्षामार्फत कशी लढवायची याबाबत अंतीम निर्णय झालेला नाही. त्यासंदर्भातील निर्णय लवकरच होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा बॅंकेसाठी अॅड. उदयसिंह पाटील तिकीट मागत आहेत. या प्रश्नावर आमदार चव्हाण म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या श्रेष्ठींकडे अनेकजण मागणी करातात. मात्र, त्यामधील अंतीम निर्णय झालेला नाही. त्यासंदर्भातील निर्णय आम्ही बैठकीनंतर निश्चीत घेवु, असेही त्यांनी सांगीतले. 

दरम्यान, सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत आमची शिवसेनेची बैठक होणार आहे. आमदार महेश शिंदे व पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक होईल. बैठकीत शिवसेनेची काय भूमिका घ्यायची, कोणते उमेदवार ठरवायचे, किती जागा लढवायच्या हे निश्चित केले जाईल. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून जर विचारणा झाली तर चव्हण यांच्याशी चर्चा करुन आमच्या जागा आम्ही ठरवून त्यांच्या पक्षाच्या जागा ते ठरवतील, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com