मुख्यमंत्र्यांसमोरचा गोंधळ महागात...माजी उपमहापौरांसह 20 जणांवर गुन्हे दाखल 

मुख्यमंत्री ठाकरे सोमवारी सांगली दौऱ्यावर होते.
 Crimes filed against 20 people, including former deputy mayors .jpg
Crimes filed against 20 people, including former deputy mayors .jpg

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या महापूर नुकसानीच्या पाहणी दरम्यान गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपचे सांगलीचे (Sangli) माजी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह पक्षाच्या २० काऱ्याकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Crimes filed against 20 people, including former deputy mayors) 

सूर्यवंशी, अमित भोसले, निलेश निकम, प्रथमेश वैद्य, राहुल माने, शांतिनाथ कर्वे, अश्रफ वांकर, प्रियानंद कांबळे, धनेश कातगडे, राजू जाधव, भाजपचे ज्येष्ठ नेते मुन्ना कुरणे, अमर पडळकर, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांच्यासह सहा जणांचा त्यात समावेश आहे. कोरोना नियमांच्या उल्लंघनासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक माहिती अशी, की मुख्यमंत्री ठाकरे सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. हरभट रस्त्यावर विविध पक्ष, संघटनांकडून त्यांना निवेदने देण्यात येणार होती. पोलिसांनी काही संघटनांच्या मोजक्या प्रतिनिधींना मुभा दिली होती. त्यात भाजप आणि सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी होते. मुख्यमंत्री गाडीतून उतरल्यावर मोठी गर्दी झाली. गोंधळ वाढत गेला आणि धक्काबुक्की सुरू झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना गाडीत बसविण्याची विनंती सुरक्षा रक्षकांनी केली. 

मुख्यमंत्री निवेदने न स्वीकारता निघाले आहेत, हे लक्षात आल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला. साखळकर यांनी घोषणा देत निवेदन भिरकावून दिले. त्यानंतर पोलिसांनी साऱ्यांना ताब्यात घेतले होते. सोमवारी रात्री उशिरा १४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. कोरोना उल्लंघानासह सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com