भाजपचे झेडपी सदस्य सुरेंद्र वाळवेकरांवर अपहरणासह गंभीर गुन्हे दाखल - BJP ZP member Surendra Walvekar charged with kidnapping | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

भाजपचे झेडपी सदस्य सुरेंद्र वाळवेकरांवर अपहरणासह गंभीर गुन्हे दाखल

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 6 जून 2021

बांधकाम व्यावसायिक राहुल तावदर यांचे अपहरण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सांगली : बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी  सांगली (Sangli) जिल्हा परिषदेचे भाजपाचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाळवेकर हे सांगलीतील भिलवडी येथील जिल्हा परिषद सदस्य आहेत. (BJP ZP member Surendra Walvekar charged with kidnapping)

सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात वाळवेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक राहुल तावदर यांचे अपहरण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनीच पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार वाऴवेकर यांच्यासह सनी गायकवाड आणि शौकत नदाफ यांच्यावर सावकारी, अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा : थेट राज्यपालांवर घराणेशाहीचा आरोप; खासदाराने उघड केली नावं

तावदर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या वडिलांनी वाळवेकर यांच्याकडून चार वर्षांपूर्वी जमीन व्यवहारासाठी 15 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे संपूर्ण कर्ज फेडण्यात आले आहे. पण वाळेकर यांच्याकडून दोन महिन्यांपासून व्याज वसुलीसाठी तगादा सुरू होता. मालकीचा पेट्रोल विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पैसे देतो असे वाळवेकर यांना सांगण्यात आले होते. पण त्यांनंतर त्यांच्याकडून सतत पैसे मागितले जात होते. 

शनिवारी वाळवेकर यांनी तावदर यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर बोलवून घेतले. त्यांच्या चारचाकी गाडीत बसवून रिव्हॅाल्व्हरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. गाडीत वाळवेकरसह गायकवाड व नदाफे हे दोघेही होते. तिथून तावदर यांना गाडीत घालून पेट्रोल पंपावर नेले. तिथेही धमकी देण्यात आली. त्यानंतर भिलवडी स्टेशन पाटीलमळाकडे जाणाऱ्या रस्त्याने त्यांनी गाडी पुढे नेली. एका ठिकाणी गाडी थांबल्यानंतर गायकवाड याला हिसका देत तिथून आपण निसटल्याचे तावदर यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. वाळवेकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख