विश्वजित कदमांच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा!

अनुमोदक म्हणून केलेल्या सहीची चर्चा रंगली होती.
BJP supports Vishwajit Kadam's candidate!
BJP supports Vishwajit Kadam's candidate!

पलूस : राज्यमंत्री विश्वजित कदम यांची सत्ता असलेल्या पलूस नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षापदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या प्रतिभा मिलिंद डाके यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे नगरसेवक संदिप सिसाळ हे सूचक होते. पण, यातील विशेष बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुरेखा फडनाईक यांनी अनुमोदक म्हणून डाके यांच्या अर्जावर सही केली आहे. (BJP supports Vishwajit Kadam's candidate!)

दरम्यान, पिठासिन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी सुमित जाधव या वेळी उपस्थित होते. भाजप नगरसेविकच्या सहीची मात्र चर्चा रंगली होती.

पलूस नगरपालिकेत विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता आहे. उपनगराध्यक्षपदाची इतरांना संधी देण्याच्या उद्देशाने अगोदरच्या उपनगराध्यक्षा सौ. कांबळे यांनी राजीनामा दिला होता. रिक्त पदासाठी रविवारी (ता. १३ सप्टेंबर) बैठक झाली. काँग्रेस श्रेष्ठींनी उद्योजक मिलिंद डाके यांच्या पत्नी प्रतिभा डाके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आज निवडणुकीची औपचारिकता पार पडली. 

सकाळी अकरा वाजता प्रतिभा डाके यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्या अर्जावर काँग्रेसचे नगरसेवक संदीप सिसाळ हे सूचक होते, तर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुरेखा फडनाईक यांची अनुमोदक म्हणून सही होती. उपनगराध्यक्षपदासाठी निर्धारीत वेळेत डाके यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध निवड झाल्याचे मारकड यांनी जाहीर केले. दरम्यान, काँग्रेसच्या डाके यांच्या अर्जावर भाजप नगरसेविका फडनाईक यांनी अनुमोदक म्हणून केलेल्या सहीची चर्चा रंगली होती. 

बिनविरोध निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी मरकड यांनी डाके यांचा सत्कार केला. पालिकेत नगरसेवक, विविध संघटना, संस्थांनी डाके यांचे अभिनंदन व सत्कार केला. पलूस येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

नगराध्यक्ष परशुराम शिंदे, काँग्रेसचे गटनेते सुहास पुदाले, नगरसेवक संदिप सिसाळ, विक्रम पाटील, नितीन जाधव, सुरेखा फडनाईक, सुरेखा माळी, अंजली मोरे, उज्वला मोरे, रेखा भोरे, स्वाती गोंदिल, ऋषिकेश जाधव, विशाल दळवी तसेच उद्योजक मिलिंद डाके, विजय डाके, गिरीश गोंदिल, शरद शिंदे, देवदास भंडारे, राजेंद्र डाके, दिलिप डाके, विकास लाटे, नितिन खारकांडे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

पलूस नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाने काम करण्याची संधी दिली आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महेंद्र लाड, खाशाबा दळवी, वैभव पुदाले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा कारभार आदर्शवत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असे नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा प्रतिभा डाके यांनी निवडीनंतर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com