सांगली भाजप शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर - BJP Sangli District Committee Declared | Politics Marathi News - Sarkarnama

सांगली भाजप शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी जंबो कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये प्रत्येकी नऊ उपाध्यक्ष आणि सचिव नेमण्यात आले आहेत. सरचिटणीसपदी सांगलीतून केदार खाडिलकर आणि मिरजेतून मोहन वाटवे यांना संधी दिली आहे. विविध आघाड्यांचेही पदाधिकारी नियुक्त केले आहेत.

सांगली  : भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी जंबो कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये प्रत्येकी नऊ उपाध्यक्ष आणि सचिव नेमण्यात आले आहेत. सरचिटणीसपदी सांगलीतून केदार खाडिलकर आणि मिरजेतून मोहन वाटवे यांना संधी दिली आहे. विविध आघाड्यांचेही पदाधिकारी नियुक्त केले आहेत.

भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी धीरज सूर्यवंशी, महिला आघाडीच्या अध्यक्षपदी अॅड. स्वाती शिंदे, उद्योग आघाडीच्या संयोजकपदी शरद नलवडे, सोशल मीडिया संयोजकपदी नीलेश निकम, कायदा आघाडीच्या संयोजकपदी प्रमोद भोकरे, प्रज्ञा प्रकोष्ट आघाडीच्या संयोजकपदी संजय परमणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप शहर जिल्हा कार्यकारिणी :

अध्यक्ष : दीपक शिंदे म्हैसाळकर,

संघटक सरचिटणीस : दीपक माने,

सरचिटणीस : केदार खाडीलकर, मोहन वाटवे, उपाध्यक्ष : विशाल पवार, बाळासाहेब पाटील, विजय घाडगे, सूरज पवार, श्रीकांत वाघमोडे, संगीता खोत, अपर्णा कदम, जयश्री कुरणे, भूपाल सरगर.

कोषाध्यक्ष : डॉ. भालचंद्र साठ्ये.

सचिव : विश्‍वजित पाटील, सविता मदने, सुजाता रक्तवान, शोभा बिक्कड, धनेश कातगडे, अतुल माने, महेश धायरे, विजय राठी, राजाभाऊ देसाई.

युवा मोर्चा : अध्यक्ष : धीरज सूर्यवंशी. उपाध्यक्ष : निरंजन आवटी. सरचिटणीस : आदित्य पटवर्धन, अजिंक्‍य पाटील.

महिला मोर्चा : अध्यक्ष अॅड. स्वाती शिंदे, उपाध्यक्ष : ज्योति शुक्‍ल, सरचिटणीस : गंगा तिडके.

अल्पसंख्याक मोर्चा : अध्यक्ष : शाहनवाज सौदागर. ओबीसी मोर्चा : अध्यक्ष : अमर पडळकर. किसान मोर्चा : अध्यक्ष : केशव पाटील. अनुसूचित जाती मोर्चा : बिरेंद्र थोरात. अनुसूचित जमाती मोर्चा : राजू जाधव.

याबाबत शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले, "प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, शेखर इनामदार तसेच महापालिका क्षेत्रातील प्रमुख नेते यांच्याशी चर्चा करुन या निवडी जाहीर करण्यात आल्या.''

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख