शिवसेनेने भाजप सोबत असलेली नैसर्गिक युती तोडून; सत्तेसाठी शेण खाल्ले! - BJP MLA Praveen Darekar criticizes Chief Minister Uddhav Thackeray  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

शिवसेनेने भाजप सोबत असलेली नैसर्गिक युती तोडून; सत्तेसाठी शेण खाल्ले!

 भारत नागणे 
शुक्रवार, 16 जुलै 2021

सध्या सत्तेचा मुकूट शिवसेनेकडे असला तरी तिजोरीची चावी मात्र राष्ट्रवादीकडे आहे.

पंढरपूर : गेल्या अनेक वर्षाच्या भाजप सोबतच्या राजकीय मैत्रीला धोका देत, शिवसेनेने केवळ सत्तेसाठी शेण खाल्ले, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. (BJP MLA Praveen Darekar criticizes Chief Minister Uddhav Thackeray) 

अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रुपांतर करावे यामागणीसाठी अकलूज ग्रामस्थांचे गेल्या 24 दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दरेकर अकलूज येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत, महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. यावेळी दरेकर म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांचे सरकार राजकीय द्वेश भावना ठेवून काम करत आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचातीचे रुपांतर नगपरिषेमध्ये केले जाते, मग अकलूजकरांवर अन्याय का असा असवाल उपस्थित करत. या पळपुट्या  सरकारचा लवकरच हिशोब चुकता करु, असे दरेकर म्हणले. 

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसची नव्हे तर भाजपची मते फुटतील!

शिवसेनेने भाजप सोबत असलेली नैसर्गिक युती तोडून, सत्तेसाठी विरोधकांबरोबर अनैसर्गिक युती करत, सत्तेसाठी शेण खाल्ले आहे. न्याय मिळावा म्हणून येथील नागरिक उपोषणाच्या माध्यमातून मायबाप सरकारकडे मागणी  करत आहेत. त्यांना आईच्या भूमिकेतून सरकारने न्याय देण्याची अपेक्षा आहे. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेल्या या सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही. सरकारने न्याय दिला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरुन हिसकावून घ्यावे लागेल. त्यानंतर मात्र आम्ही पण त्यांचे सगळे हिशोब चुकते करु असा इशाराही दरेकर यांनी दिला.

सध्या सत्तेचा मुकूट शिवसेनेकडे असला तरी तिजोरीची चावी मात्र राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे हे बारामतीकरांच्या रिमोट कंट्रोलवर काम करतात. महाविकास आघाडी सरकारच्या नसानसात राजकारण भिनले आहे. त्यामुळेच राजकीय अभिनिवेशातून येथील जनतेला वेठीस धरले आहे. मात्र, जनतेचा तळतळाट फार वाईट असतो, या सरकारने येथील जनतेला न्याय दिला नाही तर, भाजपच्या माध्यातून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा ईशारा दरेकर यांनी दिला. 

हेही वाचा : आघाडी सरकारच्या विरोधात आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

कदाचित हे काम भाजप सरकारच्या माध्यमातून व्हावे असे नियतीच्या मनात असावे असेही दरेकर म्हणाले, सोलापूरचे पालक मंत्री अकलूज पासून जवळच राहतात. त्यांना येथील जनतेचा आवाज ऐकू येत असूनही त्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतले आहे. ते पालक मंत्री नव्हे तर बालीश मंत्री आहेत. असेही दरेकर म्हणाले. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनीही राज्य सरकारच्या भूमिकेवर टीक करत, आंदोलन अधीक तीव्र करण्याचा इशारा दिला.    

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख