भास्कर जाधव विधानसभा अध्यक्ष व्हावेत का? शेलार म्हणतात...  - BJP MLA Ashish Shelar criticizes the state government | Politics Marathi News - Sarkarnama

भास्कर जाधव विधानसभा अध्यक्ष व्हावेत का? शेलार म्हणतात... 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

त्यांनी स्वबळाची भाषा करणे हास्यास्पद आहे. 

सातारा : जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाहीत. ते स्वबळावर काय लढणार, त्यांना एकमेकांच्या कुबड्या घेऊनच चालावे लागते. त्यांनी स्वबळाची भाषा करू नये. मागील निवडणुकीत हे तीन पक्ष स्वतंत्र लढले त्यावेळी त्यांची स्थिती काय होती हे राज्यातील जनतेने दाखवले आहे. हे तिघे एकमेकाशिवाय चालू शकत नाहीत. त्यांनी स्वबळाची भाषा करणे हास्यास्पद आहे, हे तीन पक्ष एकमेकांची फसगत करत, असल्याचा टोला भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला आहे. ते साताऱ्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (BJP MLA Ashish Shelar criticizes the state government) 

यावेळी त्यांना काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. तुमचे मत काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी तीन्ही पक्षांना टोला लगावला. 

हेही वाचा : डॅा. भारती पवारांच्या राज्यमंत्रीपदामागे भाजपचा आहे 'हा' मनसुबा!

विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेना आमदार भास्कर जाधव इच्छुक आहेत, आपल्याला काय वाटते, यावर आमदार शेलार म्हणाले,  अध्यक्ष कोणाला करायचे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची हिंमत दाखवावी. भास्कर जाधव यांचा शिवसेनेने उपयोग करून घेतलेला आहे. आता या तीनपक्ष्यानी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. अधिवेशनातील प्रकारामुळे राज्यभरात त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांचा वापर करून झाल्यावर त्यांना फार काय मिळेल अशी परिस्थिती नाही, असे शेलार म्हणाले.   

दरम्यान, कोरोना लॉकडाऊन वरून व्यापाऱ्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या विषयी बोलताना शेलार म्हणाले, राज्य सरकारने घाबरटपणा सोडावा, पण काळजी करणे गरजेचे आहे. जनतेनेही सहकार्य करावे. पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा प्रसार होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. वाढते लॅाकडाऊन पाहता जनतेने जिवंत राहायचे का नाही? व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा : आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही: काँग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका 

या कर्मचारी वर्गासाठी राज्य शासनाकडे कोणतीही मदतीची योजना नाही. गरीब माणसांना योजना नाहीत, रोजगार करणाऱ्यांना सुविधा नाहीत. केवळ घबराट निर्माण करायची याबाबत राज्य सरकारने सर्वंकष विचार केला पाहिजे. अन्यथा जनक्षोभ होईल, असा इशारा त्यांनी दिला. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख