पवार साहेब, याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने द्यावे!  

'कर नाही त्याला डर कशाला' त्यांनी आपली बाजू मांडावी. प्रत्येक गोष्टीत बचावासाठी राजकारण.
 Ashish Shelar, Sharad Pawar .jpg
Ashish Shelar, Sharad Pawar .jpg

सातारा : नुकताच केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले  (Udayanarane Bhosale) यांचे नाव नाही, याविषयी विचारले असता आमदार आशिष शेलार म्हणाले, उदयनराजे आमचे नेते आहेत. भाजप पक्षात नाराजीचा कोणताही विषय नाही. नव्या मंत्र्यांची यादी सर्वमान्य आहे, त्यामुळे याविषयी मी अधिक बोलू शकत, नसल्याचे शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले. (BJP MLA Ashish Shelar criticizes Chief Minister Uddhav Thackeray) 

ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे. त्यावरुन शेलार यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजप आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चूक असेल तर शिक्षा होईल, असे म्हटले आहे, यावर शेलार म्हणाले, पवार साहेबांच्या वाक्याचे आम्ही समर्थन करतो. पण चूक नसताना शिक्षा झाली तर काय करणार पवार साहेब, तसेच चूक नसलेल्यांना शिक्षा केली. तर काय करायचे पवार साहेब, याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने द्यावे, असेही शेलार म्हणाले. 

सातारा जिल्हा बँकेला ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, 'कर नाही त्याला डर कशाला' त्यांनी आपली बाजू मांडावी. प्रत्येक गोष्टीत बचावासाठी राजकारण. चौकशी आली की राजकारण करायचे मग चौकशी यंत्रणानी काम करायचे की नाही? चौकशी लागली की पक्ष पुढे करून राजकारण करून चौकशी बंद करायची, असे राज्य चालवायचे का, असा सवाल उपस्थित करून शेलार म्हणाले, यामध्ये कोणी राजकारण आणू नये.

दरम्यान, कोरोना लॉकडाऊन वरून व्यापाऱ्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या विषयी बोलताना शेलार म्हणाले, राज्य सरकारने घाबरटपणा सोडावा, पण काळजी करणे गरजेचे आहे. जनतेनेही सहकार्य करावे. पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा प्रसार होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. वाढते लॅाकडाऊन पाहता जनतेने जिवंत राहायचे का नाही? व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या कर्मचारी वर्गासाठी राज्य शासनाकडे कोणतीही मदतीची योजना नाही. गरीब माणसांना योजना नाहीत, रोजगार करणाऱ्यांना सुविधा नाहीत. केवळ घबराट निर्माण करायची याबाबत राज्य सरकारने सर्वंकष विचार केला पाहिजे. अन्यथा जनक्षोभ होईल, असा इशारा त्यांनी दिला.

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com