पवार साहेब पंढरपूरची काळजी करू नका, आम्ही जबाबदारी पूर्ण करु

राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांची उमेदवारी सोमवारी जाहीर केली आहे.
 Jayant Patil .jpg
Jayant Patil .jpg

पंढरपूर : पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, आम्ही ही जबाबदारी पूर्ण करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांची उमेदवारी सोमवारी जाहीर केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे बुधवारी (31 मार्च) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पवार पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार का? त्याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, 'शरद पवार यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैद्यकीय सल्ल्याने ते बाहेर पडतील. या मतदारसंघाची काळजी करु नका असे त्यांना सांगितले आहे. प्रचाराला कोण नेते येतील याचे नियोजन लवकरच, करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.   

सर्वानुमते भगीरथ भालकेंना उमेदवारी 

सगळ्यांशी चर्चा करुन भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. वातावरण चांगले आहे. बंडखोरी झाली असली तरी त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. अर्ज माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व कायकर्ते प्रचार करतील, कोरोना काळ असला तरी अनेक राज्यात निवडणुका सुरु आहेत. भाजपचे प्रशांत परिचारक आणि उमेदवार समाधान अवताडे दोघांनी एकमेकाविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील असे वाटत नाही. त्या दोघांचे अनेक कार्यकर्ते भगीरथ भालके यांच्याशी संपर्क करत आहेत, असेही पाटील म्हणाले. 

चंद्रकांत पाटलांचे वक्यव्य बेजबाबदारपणाचे

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे लॉकडाऊनला विरोधातील वक्तव्य बेजबदारपणाचे आहे. लॉकडाऊनबाबत मध्य मार्ग काढून निर्णय होईल. सर्वसामान्य माणसाला याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. आम्ही तिन्ही पक्ष एकमताने निर्णय घेतो. आम्हा तिघात भांडण लावण्याचा उपद्वाप चंद्रकांत दादा आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मात्र, त्यांना यश येणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.  

अवताडेंचाही उमेदवारी अर्ज 

दरम्यान, भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचाही उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी चंद्रकांत पाटील हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. शेतकरी प्रश्नावर आम्ही ही निवडणूक लढू, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com