बार्शीच्या सराफाने केली गृहमंत्र्यांची बदनामी; गुन्हा दाखल

राज्याचे गृहमंत्री यांचे नाव घेऊन पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे विरुद्घ गंभीर स्वरुपाचे आरोप गुगळे यांनी केले होते.
 Barshi bullion defames Home Minister; File a case .jpg
Barshi bullion defames Home Minister; File a case .jpg

बार्शी : राज्यात कोरोना संसर्ग, प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करावेत असे आदेश असताना सराफाने दुकान उघडले होते, दुकान पोलिसांनी (Police) सील केले ही स्वतःवरील कारवाई टाळली जावी यासाठी पोलिस निरीक्षकांनी पाच लाख रुपये मागितले, अशी व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात प्रसारित करुन गृहमंत्री, गृहविभागाची बदनामी केल्याप्रकरणी बार्शीच्या प्रतिष्ठित सराफांविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल झाल्याने सराफ व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Barshi bullion defames Home Minister File a case)

हळद गल्लीतील सराफ अमृतलाल गुगळे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून पोलिस उपअधिक्षक अभिजित धाराशिवकर (Abhijit Dharashivkar) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना १७ एप्रिल रोजी घडली होती, तपासानंतर ८ मे रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अमंलबजावणी सुरु असताना १७ एप्रिल रोजी गस्तीवरील पोलिसांना चांदमल ज्वेलर्स दुकान आदेशाचे उल्लंघन करुन सुरु असल्याचे दिसले. त्याचदिवशी दुकानमाल अमृतलाल गुगळे यांचेवर पोलिस वशिष्ठ घुले यांनी आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग, कोविड १९ विनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला व दुकान ३० दिवसांसाठी सील केले होते.

सराफ गुगळे यांनी (ता. १८ एप्रिल) रोजी स्वत:ची व्हिडिओ क्लिप प्रसार माध्यमांवर प्रसारित केली. त्यामध्ये त्यांनी पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी गुगळे यांच्या पत्रकार मित्रांकडे त्यांचेवरील कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली, त्यास गुगळे यांनी नकार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक गिरीगोसावी गुगळे यांना म्हणाले की, आम्हाला गृहमंत्र्यांपर्यंत हप्ते पोहचवावे लागतात वैगेरे असा व्हिडिओ क्लिपमध्ये उल्लेख होता. राज्याचे गृहमंत्री यांचे नाव घेऊन पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे विरुद्घ गंभीर स्वरुपाचे आरोप गुगळे यांनी प्रसार माध्यमाद्वारे केल्यामुळे पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वये या प्रकरणाची चोकशी करण्याचे आदेश मला दिले होते.

प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली असता पोलिस निरीक्षक, कारवाईतील अंमलदार, गुगळे यांचेसाठी भेटलेले पत्रकार विजय निलाखे, योगेश लोखंडे, राजकीय व्यक्ती राजेंद्र गायकवाड यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. आपल्यावरील कारवाई टाळली जावी यासाठी पुर्वदूषितपणे पोलिसांची बदनामी होईल, अशी व्हिडिओ क्लिप प्रसारित करुन महाराष्ट्र पोलिस दलाची, गृहमंत्री, गृहविभाग यांची जाणीवपूर्वक बदनामी केली म्हणून माझी अमृतलाल गुगळे यांचे विरुद्ध सरकारकडून फिर्याद आहे. असे धाराशिवकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com