विधानसभेला मताधिक्य घटले अन् मोहिते पाटलांनी दीड वर्षानंतर घेतला हा निर्णय 

माळशिरस तालुक्यातील राजकीय गणित पाहता लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास एक लाखाचे मताधिक्य मिळाले होते.
 Arjun Singh Madan Singh Mohite Patil .jpg
Arjun Singh Madan Singh Mohite Patil .jpg

नातेपुते (जि. सोलापूर) : माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य पाहून मोहिते पाटील यांच्याकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांला संधी देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पदावर कोणत्या कार्यकर्त्याची वर्णी लागते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माळशिरस पंचायत समितीमध्ये मोहिते पाटील गटाची निर्विवाद सत्ता आहे. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील या सभापती आणि किशोर सुळ हे उपसभापती होते. 31 डिसेंबर 2019 ला शोभा साठे या सभापतीपदी आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली होती. 

माळशिरस तालुक्यातील राजकीय गणित पाहता लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास एक लाखाचे मताधिक्य मिळाले होते, परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा निसटता विजय झाला होता. लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. मोहिते पाटील गटास बेरजेचे राजकारण करणे गरजेचे आहे. आपल्या कुंटुंबा शिवाय इतर कार्यकर्त्यास संधी देण्याचे श्रेष्ठींनी मनोमन ठरवले आहे. त्यानुसारच अर्जुनसिंह यांनी रविवारी (ता. २८ मार्च) राजीनामा दिला असून त्यांच्या सव्वा वर्षाच्या कारकिर्दीत पंचायत समितीमध्ये भरीव काम झाले आहे. 

येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी जोरदार आणि तारेवरची कसरत सत्ताधारी गटास करावी लागणार आहे. तरच पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत मिळणार आहे. असे विधानसभेच्या मतांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून हा राजीनामा देऊन योग्य कार्यकर्त्यास या पदावर बसविण्याचे निश्चित झाल्याचे सजते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com