विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात 

सध्या विश्वजीत कदम हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत
विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात 
Accident to the police vehicle of Vishwajeet Kadam's convoy .jpg

सांगली : कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Viswajit Kadam) महापूर पाहणी दौर्‍यावेळी ताफ्यातील पायलट गाडीचा अपघात झाला. सांगलीच्या पलूस तालुक्यातील नागठाणेजवळ अपघात झाला आहे. दौर्‍यावेळी दुचाकीला वाचवताना पोलिस गाडी घसरुन खांबावर आदळून हा अपघात झाला. या गाडीत असणारे दोन पोलिस (police) कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर आष्टामधील रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. (Accident to the police vehicle of Vishwajeet Kadam's convoy) 

कदम हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. पलुस तालुक्यातील नागठाणे येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. त्यांच्यासोबत असलेल्या एस्कॉर्ट पोलिस गाडीला एक दुचाकी आडवी आली. दुचाकीला धडक बसण्यापासून वाचवत असताना पोलिसांची गाडी चिखलात स्लीप होऊन खांबास धडकली. गाडी धडकल्यानंतर जाग्यावर उलटली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीतील पोलिस हवालदार सुर्वे व अन्य पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

अपघातानंतर कदम यांनी तातडीने स्वतःच्या गाडीतून आष्टा येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये जखमी पोलिसांना उपचारास दाखल केले. त्यानंतर कदम पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. मुसळधार पावसामुळे सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी सध्या विश्वजीत कदम हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 

Related Stories

No stories found.