कोयना धरणाचे 6 दरवाजे 8 फुटांनी उचलले; प्रतिसेकंद ३५ हजार १७१ क्युसेस पाण्याचा विसर्ग 

धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ८४ हजार ८७८ क्युसेस इतक्‍या पाण्याची आवक होत आहे.
 Koyna Dam .jpg
Koyna Dam .jpg

कोयनानगर (सातारा) : कोयना (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटावरून आठ फूटवर उचलण्यात आले. या सहा वक्री दरवाजातून विनावापर ३३,०७१ क्युसेस व कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१०० क्युसेस असे प्रतिसेकंद ३५ हजार १७१ क्युसेस पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात (Koyna and Krishna River) सोडण्यात येत आहे. (The 6 gates of Koyna Dam were lifted by 8 feet) 

धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ८४ हजार ८७८ क्युसेस इतक्‍या पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढविण्यात येणार असल्याची माहिती आहे. सरासरी प्रतिसेकंद ५० हजार क्युसेस पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्याच्या शक्यता धरण व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आल्या आहेत. धरणात सध्या ८३.४३ टीएमसी पाणीसाठा आणि २१४५ फूट पाणी उंची झाली आहे‌. 

काहीकाळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने शुक्रवारी सकाळी पुन्हा दमदार बरसायला सुरुवात केली. कोयनानगरसह मिरगाव, ढोकावळे, कामरगाव, हुंबरणी घरांवर दरड कोसळली असून गावांना जाण्याच्या मार्गवरच दरड कोसळल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. 15 लोक बेपत्ता झाल्याची माहितीही शासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.  

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव्र आणि गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने कालपासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी आपली जनावरे, महत्त्वाच्या वस्तू घेऊन स्थलांतरीत व्हावे असे, आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे.  

आपल्या सर्वांची मोठी आबाळ होईल पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही, अशी भावनिक साद पाटील यांनी नागरिकांना घातली आहे. सांगलीतही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधी, सरपंच, यंत्रणेने ताबडतोब हालचाली कराव्यात. शिवाय तेथील प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभाग धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे. तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. शिवाय प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात असल्याचा धीरही मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला दिला आहे. 

एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावे. पश्चिम महाराष्ट्राने अशी अनेक संकट पाहिली आहेत. आपण या संकटालाही तोंड देऊ असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील २०१९ चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे, आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये. यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत, असेही पाटील यांनी सांगितले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com