यवतमाळात अभिनेत्री कंगना राणावत विरोधात शिवसैनिक  उतरले रस्त्यावर

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चा तपास सुरु आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता. सदर प्रकरणात योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवत कंगना राणावत ही सातत्याने उध्दव ठाकरे सरकार विरोधात बेताल वक्तव्य करीत आहे. आता तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात सुध्दा कंगनाने वक्तव्ये करणे सुरु केले आहे
Shivsena Agitation Against Kangana Ranaut in Yavatmal
Shivsena Agitation Against Kangana Ranaut in Yavatmal

यवतमाळ : हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान शुक्रवारी यवतमाळात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन कंगना राणावत च्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. मुंबई पोलिस तसेच  महाराष्ट्राला बदनाम करण्यामागे  भाजपाचा हात असल्याचा आरोप सुध्दा  शिवसेनेच्या पदाधिका-यांनी केला आहे. 

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चा तपास सुरु आहे. दुसरीकडे  मुंबई पोलिसांनी  या प्रकरणाचा तपास केला होता. सदर प्रकरणात योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवत कंगना राणावत ही सातत्याने उध्दव ठाकरे सरकार विरोधात बेताल वक्तव्य करीत आहे. आता तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात सुध्दा कंगनाने वक्तव्ये करणे सुरु केले आहे. दरम्यान, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाल्याने  यवतमाळच्या दत्त चौकात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन प्रचंड घोषणाबाजी केली. 

शिवसेना महिला पदाधिका-यांनी कंगना राणावत चे पोस्टर  पायदळी तुडवत तसेच चपलेने बदडत तिचा निषेध केला. राज्यात तसेच देशात अनेक महत्वाचे प्रश्न असतांना सुशांत सिंह राजपुत च्या आत्महत्येचे भाजपा राजकारण करीत असल्याची टिका शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी केली. कंगनाला मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर तिने पाकिस्तानात जाण्याचा सल्ला सुध्दा त्यांनी दिला. याप्रसंगी  शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने परीसर दणाणून गेला. 

या आंदोलनात  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड, जिल्हा परीषदेतील शिवसेनेचे  गटनेते श्रीधर मोहोड, यवतमाळ विधानसभेचे सह संपर्क प्रमुख संतोष ढवळे,  प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, संजय रंगे, प्रवीण निमोदिया, पिंटु बांगर, अशोक पुरी, संजय उपगलवार,  सुधीर मुनगीनवार, शिवसेना महिला आघाडीच्या निर्मला विनकरे, कल्पना दरवई, ज्योति चिखलकर, संगीता पुरी, गार्गी गिरटकर, रश्मी तोंदवाल, विद्या सोमदे, संगिता बागडे, अर्चना बागडे, अर्चना भगत, अश्विनी बागडेश्वर उपस्थित होत्या.

भाजपाने वकीली बंद करावी

कंगना राणावतने महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली. दुसरीकडे भाजपाचे नेते मात्र तिची वकीली करीत आहे.  यावरुन कंगना ही भाजपची प्रवक्ती असल्याचे दिसून येते. कंगना राणावतने आपले बेताल वक्तव्य बंद करावे.  महाराष्ट्रातील  वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. वादग्रस्त विधान केल्याने कंगनाने माफी मागावी  अन्यथा तिचा एकही चित्रपट आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शीत होऊ देणार नाही -  पराग पिंगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख, यवतमाळ

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com