लॉकडाऊन मंत्री संजय राठोडांच्या पथ्यावर? 

टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉटरिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी (ता.२३ फेब्रुवारी) पोहरादेवी येथे येणार आहेत.
Sanjay Rathore, Pooja Chavan .jpg
Sanjay Rathore, Pooja Chavan .jpg

वाशिम : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉटरिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी (ता.२३ फेब्रुवारी) पोहरादेवी येथे येणार आहेत. त्यामुळे राठोड समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे.  मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने वाशिम जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे मंत्री राठोड खरोखच या ठिकाणी येणार की नाही? संचारबंदी असल्याने पोलिसांना इतरही कामे वाढली आहेत. त्यातून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुढे सरकलेला नाही. यामुळे हा लॉकडाऊन वनमंत्री राठोड यांच्या पथ्यावर तर पडला नाही ना? अशी चर्चा राज्यात सुरु आहे.  

संजय राठोड समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरु असल्याने, पोहरादेवी येथे गर्दी होऊ नये म्हणून मानोरा पोलिसांनी बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आम्ही आज तीन वाजता चर्चा करून बंजारा समाजाला आवाहन करणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

पोहरादेवी येथे उद्या वनमंत्री संजय राठोड येणार असल्याचा अधिकृत दौरा आमच्याकडे आला नाही. मात्र, कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढत आहेत. त्यामुळे आम्ही पोहरादेवी येथील महंतांना नोटीस बजावली असून, येथील महंतांसोबत आमची चर्चा सुरू, असल्याची माहिती वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे. 

दरम्याण, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज संजय राठोड यांच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, महाराज कर्नाटकमध्ये असून, उद्या हजर राहणार आहेत. अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली आहे. 

दरम्यान, पूजाने आत्महत्या केली नाही, असा दावा तिच्या नातेवाईक शांताबाई राठोड यांनी केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, पूजाने आत्महत्या केली नाही. पूजाला यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच तिला मारले असावे आणि पुण्यातील बिल्डींगवरून फेकले असावे. पूजा ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. तिने आत्महत्या केली नाही तर तिचा घातच झाला आहे. 

या प्रकरणात पोलीस योग्यप्रकारे तपास करत नसल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून पुणे पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालकांचेही या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांकडून यवतमाळमध्येही याप्रकरणाचे धागेदोरे शोधले जात आहेत. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच म्हणाले होते की, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चैाकशी पोलीस करीत आहेत. त्यांना चौकशीला वेळ दिला पाहिजे. या तपासात राजकीय हस्तक्षेप नाही.
 

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com