डॅा. शिंगणेंना महावितरणचे अधिकारी जुमानेनात: संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयास ठोकले कुलूप

हिवरखेड पूर्णा येथील मागील दोन महिन्यांपासून विद्युत रोहित्र जाळाले असून त्यामुळे गांव अंधारात आहे.
 The villagers of Hivarkhed Purna locked the MSEB office  .jpg
The villagers of Hivarkhed Purna locked the MSEB office .jpg

सिंदखेड राजा (बुलडाणा) : तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील ग्रामस्थांनी गांवातील विविध समस्यांना कंटाळून सिंदखेड राजा (Sindkhedraja) येथील उपविभागीय महावितरणच्या (MSEB) कार्यालयाला सरपंचासह ग्रामस्थांनी कुलूप ठोकले आहे. उपविभागीय कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्यामुळे काही काळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यालयातील अधिकार्‍यांनी माहिती देऊन सुद्धा किनगांव राजा येथील सहाय्यक अभियंता नागेश गायकवाड हे तब्बल एक ते दीड तास उशिरा आल्यामुळे हिवरखेड पूर्णा येथील सरपंच व ग्रामस्थांनी त्यांना फुलांचा हार घालून स्वागत केले. त्यानंतर सहाय्यक अभियंता नागेश गायकवाड यांना धारेवर धरून प्रश्नांचा भडिमार केला. (The villagers of Hivarkhed Purna locked the MSEB office) 

हिवरखेड पूर्णा येथील मागील दोन महिन्यांपासून विद्युत रोहित्र जाळाले असून त्यामुळे गांव अंधारात आहे. मध्यंतरी विद्युत रोहित्र बदलण्यात आले. मात्र, ते अर्धदुरूस्त असल्यामुळे मूळ समस्या कायम राहिली आहे. गांवातील संपुर्ण वीज केबल ही कमकुवत झाली असून ती वीजतार ओढून सरळ करणे आवश्यक आहे. गावातील पाच ते सात वर्षांपासून काही विद्युत पोलविना वायरिंग असल्यामुळे त्यावरची वायरिंग व्यवस्थित करणे आवश्यक असतांना याकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील तीन ते चार तारांची व्यवस्था करणे आवश्यक आहे, चार वर्षापासून गावांमध्ये जादाचे विद्युत रोहित्र आवश्यक असताना फक्त आश्वासन दिले जाते. परंतु ते बसविले जात नाही. 

यासह अनेक समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त आहे. महावितरणच्या समस्यांना कंटाळून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी कुलूप ठोकून उपविभागीय अधिकारी येत नाही. तो पर्यंत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक राम पारवे यांनी उपविभागीय अभियंता कार्यालयाला भेट देवून सरपंच व ग्रामस्थांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सुचनाकडे दुर्लक्ष

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ता. ३१ जुलै रोजी पंचायत समितीच्या हॉलमध्ये बैठक घेऊन महावितरणला नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे महाविरणकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भाग अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्यामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. अनेक गांवामध्ये महाविरणचे कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीजतारा अनेक ठिकाणी कमकुवत झाल्या आहेत. अधिकारी पालकमंत्री शिंगणे यांनी दिलेल्या सूचनांकडे केव्हा लक्ष देणार? हे आता पहावे लागणार आहे. 

सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांना काढले कार्यालयाच्या बाहेर 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपविभागीय कार्यालयात उपस्थित असलेल्या सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांना हिवरखेड पूर्णा येथील ग्रामस्थांनी बाहेर काढले होते. परंतु उपस्थित सहाय्यक अभियंता यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. सहाय्यक अभियंता व कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर जात नसल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कार्यालयात उपस्थित असलेले २ सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांना अखेर ग्रामस्थांनी बाहेर काढून उपविभागीय कार्यालयाला कुलूप ठोकले. 
Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com