पोलिसांवर हल्ला करणाऱ्या शिवसंग्राम जिल्हा उपाध्यक्षांसह तिघांना अटक  

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून अंगावर खुर्ची भिरकवून जीवे मारण्याची, धमकी.
 Three arrested including Shiv Sangram district vice president .jpg
Three arrested including Shiv Sangram district vice president .jpg

सिंदखेड राजा (बुलडाणा) : कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून अंगावर खुर्ची भिरकवून जीवे मारण्याची, धमकी दिल्याप्रकरणी शिवसंग्राम संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षासह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली. सदर घटना नाव्हा टी पॉईंटवर सोमवारी सायंकाळी घडली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सिंदखेड राजा पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत काही पोलिस कर्मचारी नाव्हा टी पॉईंट वर कर्तव्य बजावत होते. यावेळी छावा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा शिवसंग्राम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, अंकुश जाधव व पी. पी घुगे पोलिसांच्या जवळ आले आले व गाड्या सोडून देत जा असे सांगितले. अन्यथा इथे टी पॉइंटवर उभे राहू नका म्हणून दमदाटी केली.

यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तुम्ही आमच्या वरिष्ठांना सांगा असे, सांगितले असता अशोक जाधव व घुगे म्हणाले तू आम्हाला ओळखत नाही आमचा इतिहास तुला माहित नाही. कुणालाही विचारून घ्या असे म्हणून अशोक जाधव याने खुर्ची डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस शिपायाने सदर हल्ला डाव्या हाताने चुकविला. त्यामुळे त्यांच्या हाताला मार लागला. पोलिस कर्मचाऱ्या याच्या अंगावर कोणी धावून जात असल्याचे पाहून जवळ उभ्या असलेले चार पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांनी वेळीच धाव घेऊन हल्लेखोरांच्या तावडीतून पोलिस कर्मचाऱ्यास वाचविले.

याबाबत बुलडाणा पोलिस मुख्यालयातील कर्मचारी एकनाथ सोमनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून सिंदखेडराजा पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अशोक जाधव, अंकुश जाधव दोघे (रा. सिंदखेड राजा)  व पि. पी घुगे (रा. पळसखेड झाल्टा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राम पारवे व पोलीस हेड कॉन्स्टेबल. प्रवीण डोईफोडे पुढील तपास करत आहेत. 

हे ही वाचा...

भाजपच्या नेत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

बुलडाणा : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मंगळवारी (ता. २१) खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

यावेळी आमदार राजेश एकडे, आमदार संजय गायकवाड, आमदार डॉ. संजय रायमुलकर, माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, सहसंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम दाणे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्यासह काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com