Strong discussion of NCP banner in the district .jpg
Strong discussion of NCP banner in the district .jpg

थँक्यू मोदी सरकार! राष्ट्रवादी काँग्रेसने मानले पंतप्रधानांचे जाहीर आभार

बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख शहर व गांवामध्ये सद्या राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेल्या बॅनरची चर्चा पहायला मिळत आहे.

सिंदखेड राजा : बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख शहर व गांवामध्ये सद्या राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेल्या बॅनरची चर्चा पहायला मिळत आहे. 'थँक्यू मोदी सरकार'च्या उपहासात्मक बॅनरने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली 'थँक्यू मोदी सरकार' हे बॅनर सर्वत्र लावण्यात आले आहेत. 

पेट्रोल शंभरीच्या आसपास, खड्ड्यात गेलेला शेअर बाजार, बेरोजगारी व आकाशाला भिडलेल्या महागाईचा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. इंधन महागले प्रवास करणार कसा? अन्नधान्य महागले खाणार काय? गॅस महागले अन्न शिजवणार कसे? जनता विचारतेय मोदाजी, उत्तर द्या असे प्रश्न बॅनरवर उपस्थित करण्यात आले आहेत.

मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे.  सध्या पेट्रोलसाठी ९८.९८ रूपये मोजावे लागत आहे. तर, डिझेल ८८.४७ रूपये लिटरपर्यंत पोहचले आहे. घरगुती गॅसचे दर ८२८ रुपये झाले आहे. त्याचा थेट परिणाम दळणवळणावर झाल्याने भाजीपाला, गहू, तांदूळ, हरभरा व तुरीची दाळ, खाद्य तेल या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

देशात सध्या सर्वाधिक महागाई आहे. त्यामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वत्र बॅनर लावले असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागांतील नागरीकांमध्ये या बॅनरची चोरदार चर्चा सुरू आहे.

महागाई मुळे सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. डिझेल व पेट्रोलच्या दरात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. त्यातच प्रचंड बोरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर महत्त्वाच्या ठिकाणी 'सब जगसे पड रही है मार थँक्यू मोदी सरकार' असे फलक लावून अनोख्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदवला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी सांगितले.   
 
Edited By - Amol Jaybhaye   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com