भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा"

त्यांनी पक्षवाढीसाठी परिश्रम केलेले असतांना कालपरवापर्यंत पक्षाला नावही माहीत नसलेल्या लोकांना पक्षाने वरच्या पायऱ्या चढविल्या आहेत.
 Chandrakant Thackeray, Devendra Fadnavis, jpg
Chandrakant Thackeray, Devendra Fadnavis, jpg

मंगरुळपीर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी (ता. ३ जून) रोजी नांदेड वरून थेट वाशिम गाठले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे (Chandrakant Thackeray) यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे जंगी स्वागत केलेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर तर नाही ना? त्यांच्या व फडणवीसांमध्ये काही खलबत झाली असेल, अशीही चर्चा जिल्हाभरात रंगली आहे. (NCP leader Chandrakant Thackeray meet  Devendra Fadnavis)

राज्यात सध्या मराठा आरक्षण व ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण संपुष्टात आल्याने महाविकास आघाडीच्या सरकारला या विषयावर घेरण्यासाठी फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण नियोजन केले असून याचाच भाग म्हणून त्यांनी राज्याचा दौरा आखला आहे. यात मराठा आणि ओबीसी समाजातील नेत्यांना जवळ घेण्याचे नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात भाजपला साथ देऊन भाजपच्या माध्यमातून मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी या दोन प्रवर्गातील जनाधार असलेल्या बड्या नेत्यांना गळाला लावण्याचा विडा फडणवीसांनी उचलल्याचे कळते. त्यासाठी अशा वजनदार नेत्यांना भाजपमध्ये घेण्याची त्यांची योजना असल्याचे कळते. 

भाजप विषयीचे डॅमेज कंट्रोल करण्याला येत्या काळात प्रमुख प्राधान्य देणार असून, असे करतांना पक्षातील जुन्या नेत्यांऐवजी नव्या दमाच्या वजनदार युवानेत्यांना बळ देणार आहे. वाशिम जिल्ह्याला फडणवीस यांनी कोरोना बाबत भेट दिली. मात्र, चंद्रकांत ठाकरे यांना सदिच्छा भेट दिल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या स्वागत भेटीने जिल्ह्यातील राजकीय समिकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत ठाकरे हे जिल्ह्यातील एक मोठे राजकीय प्रस्थ, असल्याने त्यांनी चंद्रकांत ठाकरे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. चंद्रकांत ठाकरे भाजपत आल्यास भाजप विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाला न्याय व वाव मिळू शकतो. असी ऑफर असू शकते यांची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी देतांना चंद्रकांत ठाकरे यांना नेहमीच डावलल्याची त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची भावना आहे. याबाबतसुद्धा या भेटीत उघड चर्चा झाल्याचे कळते. 

पश्चिम वऱ्हाडातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीत चंद्रकांत ठाकरे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी पक्षवाढीसाठी परिश्रम केलेले असतांना कालपरवापर्यंत पक्षाला नावही माहीत नसलेल्या लोकांना पक्षाने वरच्या पायऱ्या चढविल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चंद्रकांत ठाकरे यांच्यावर नेहमीच अन्याय झाल्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावना पाहता फडणवीस यांनी नेमक्या ह्याच बाबी हेरून या मुद्द्याला हात घातल्याने ठाकरे राष्ट्रवादीशी घरोबा तोडून भाजपमध्ये जाणार का? अशा राजकीय चर्चा आहे. ठाकरे त्यांनी वाशिम जिल्हा परिषदेत सभापती, उपाध्यक्ष व अध्यक्ष पदावर कामकाज केलेले आहे.

फडणवीस-ठाकरे भेटीने नवे राजकीय समीकरण उदयास येणार?

चंद्रकांत ठाकरे यांना राजकीय वारसा असून त्यांचे वडील सुभाषराव ठाकरे हे राज्याचे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांनी 15 वर्ष जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी पाठिंबा दिलेल्या आमदारांच्या गटात ते सामील होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यांचा समावेश होता. तसेच सुभाषराव ठाकरे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व फडणवीस यांच्याशी असलेले मधुर संबंध, असा राजकीय वारसा असल्याने चंद्रकांत ठाकरे यांच्या भाजप सोबत जाण्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलू शकते. 

मात्र, या राजकीय चर्चावर खुद्द चंद्रकांत ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, याविषयी राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या असून राजकीय विश्लेषक आपापली वेगवेगळी मते व्यक्त करीत असल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com