Sanjay Kute, Sanjay Gaikwad .jpg
Sanjay Kute, Sanjay Gaikwad .jpg

आमदार संजय कुटेंनी केले चॅलेंज पूर्ण 

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी दुसर्‍या दिवशीही शहरात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची धुसफुस कायम होती.

बुलडाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी दुसर्‍या दिवशीही शहरात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची धुसफुस कायम होती. आमदार संजय गायकवाड व भाजपचे आमदार संजय कुटे यांनी पत्रकार परिषदा घेतल्या तर भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले.  

संजय गायकवाड यांनी एका व्हिडीओमध्ये कुटे यांना ''तुम्ही माझ्या आसपास येऊन दाखवा, असा इशारा दिला होता. त्यानंतर कुटे यांच्या वाहणावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणानंतर कुटे यांनी ही 'मी बुलडाणा शहरात येत आहे. हिंमत असेल तर आडवून दाखवा' असे म्हटले होते. त्यानुसार कुटे यांनी बुलडाणा येथे गायकवाड यांच्या कार्यालयाजवळ आल्यावर गाडीतून खाली उतरत जयस्तंभ चौकापर्यंत पायी चालत गेले. यामुळे सोशल मीडियावर ही पडसाद उमटले. कुटे यांनी आपले चॅलेंज पूर्ण करून दाखवल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली होती.

दरम्यान, संजय गायकवाड यांनी त्यांच्या कार्यालयावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणामुळे अनेकांचे जीव जात आहेत. अशाही परिस्थितीत भाजप केवळ राजकारण करीत आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेते मंडळी सर्वसामान्य जनतेच्या विरोधी भूमिका घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. यामुळे या सर्व मंडळींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. याशिवाय कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍या संदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील या मंडळींवर दाखल करण्यासाठी आपण पोलिस प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. 

आमदार डॉ. संजय कुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी महाराष्ट्रातील शासन हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. कोरोना रोखण्यात त्यांना अपयश येत आहे. केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटर चा पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा, लस आदी सर्व प्रकारची मदत केली जात आहे. मात्र राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. आमदार गायकवाड यांनी केलेल्या विधानाबाबत त्यांनी आमच्यासाठी हा विषय संपला असल्याचे सांगितले होते. 

गाडी अडविणारांना अटकआमदार कुठे यांची गाडी अडवून गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली. तर गायकवाड यांच्या संदर्भात आपण वकिलांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्यानंतर भाजपच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले.

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com