आमदार गायकवाडांचे महाराजांच्या जखमेवर मीठ : टिच्चून बिर्याणी आणि अंडी वाटप

महाराजांच्या नावावर टिच्चून गायकवाड यांनी बिर्याणी वाटप करून आणखी मीठ चोळले आहे.
  MLA Sanjay Gaikwad .jpg
MLA Sanjay Gaikwad .jpg

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) हे मांसाहार करण्याच्या आपल्या मतांवर ठाम आहेत. वारकरी संप्रदायातील अनेक महाराजांनी त्यांच्यावर टिकेची झोड उडवली असली तरी त्यांनी कोरोना रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे वाटप करून या महाराजांना आणखी डिवचले आहे. (MLA Sanjay Gaikwad refused to apology for insisting nov neg food for corona patients)  

कोरोना काळात उपास-तापास करू नका. आता तुमच्या कामात देवही येणार नाही. कारण की देवाने आपला दरवाजा बंद केलेला आहे. म्हणून मांसाहार करा, असे आवाहन त्यांनी जाहीरपणे केले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. संजय गायकवाड यांनी आज स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटर मधील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी व बॉईल अंड्यांच्या आहाराचे वाटप केले आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सर्व सरकारी कोविड रुग्णालय त्याचबरोबर खाजगी कोविड रुग्णालय फुल झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या महामारीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी किमान एक दिवसाआड अंडे, मटण ,चिकन हे आपल्या आहारात घ्यावे आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवावी, असा आवाहन करत आग्रहाने या पदार्थांचे वाटप केले.

गायकवाड यांच्या या वक्तव्यावर वारकऱ्यांनी आक्षेप घेत थेट पोलिसांत तक्रार केली होती. प्रशांत महाराज दहीकर यांनी वारकऱ्यांना या वादावर पडदा टाकण्याचे आवाहन केले होते. आमदार गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्यासोबत माध्यमांसमोर येऊन त्यांनी हा वाद पुढे न वाढविण्याची विनंती वारकरी समुदायाला केली होती. त्यानंतर हा वाद संपला, असे समजले जात होते. मात्र, वारकऱ्यांना पोलिसांत आणि तहसीलदारांकडे तक्रार केल्याने हे प्रकरण आणखी चिघळणार, असे बोलले जात आहे.

गजानन महाराज दहिकर, अच्युत महाराज बोराडे, प्रकाश महाराज पांडे आणि इतरही बऱ्याच महाराज मंडळींसोबत अतिशय खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली. काही महाराज मंडळींना आई-बहिणीवर शिवीगाळ केली तर कुणाला धर्माबद्दल बोलायला सुरुवात केली. एवढंच नाही तर मी देवधर्म काही मानत नाही. देवाचा चमत्कार असता तर कोरोना आलाच नसता, असेही विधान केले. वारकऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागायची विनंती केली असता, माझं काही चुकलं नाही, मी माफी मागणार नाही, असे विधान संजय गायकवाड यांनी केले होते.

संजय गायकवाड यांच्या बाजूने आतापर्यंत शिवसेनेच्या एकाही आमदाराने प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट काही आमदारांनी गायकवाड यांनी वारकऱ्यांसोबत असे बोलायला नको होते, असे मत व्यक्त केल्याचे वारकऱ्यांचे म्हणणे आहे. बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही गायकवाड यांनी वारकऱ्यांसोबत असे बोलणे योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे आणि सर्व राजकीय मंडळी आम्ही महाराष्ट्रातील संतांचा आदर करतो. मी स्वतः आमदार संजय गायकवाड यांना सांगितले झालेल्या प्रकाराबद्दल संत मंडळीची माफी मागा. त्यामध्ये आपला काहीही कमीपणा नाही. पण शेवटी आता त्यांची मर्जी आहे, असे वक्तव्य खासदार जाधव यांनी केल्याचे वारकऱ्यांनी सांगितले.

गायकवाड हे कोणाचेही ऐकायला तयार नाहीत आणि वारंवार महाराज मंडळींना शिवीगाळ करणे धमक्या देणे सुरूच असल्यामुळे आम्ही अकोट तहसील कार्यालय, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, असल्याचे महाराजांनी म्हटले होते. या साऱ्या महाराजांच्या नावावर टिच्चून गायकवाड यांनी बिर्याणी वाटप करून आणखी मीठ चोळले आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com