कोरोनाकाळात मेहकरमध्ये राजकीय धक्का  

मेहकर पंचायत समितीच्या राजकारणात कोरोना काळात एकदम राजकीय धक्का बसला आहे.
 ShivSena .jpg
ShivSena .jpg

मेहकर (जि.बुलडाणा) : मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव यांनी अचानक जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्याकडे सोमवारी (ता. १९ एप्रिल) ला व्यक्तिगत अडचण असल्याचे सांगत राजीनामा पाठवला. सदर राजीनाम्यावर साक्षीदार म्हणून पंचायत समितीचे सदस्य राजू घनवट व जया खंडारे यांच्या सह्या आहे. त्यामुळे मेहकर पंचायत समितीच्या राजकारणात कोरोना काळात एकदम राजकीय धक्का बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभर अनेक राजकीय चर्चांना उधान आले होते. 

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांचे विश्वासू समजले जाणारे निंबाजी पांडव यांनी राजीनामा दिल्यामुळे जिल्ह्यात दिवसभर राजकीय चर्चांना उधान आले होते. 

 सभापती निंबाजी पांडव यांच्या सोबत फोन वर संपर्क साधला असता, त्यांना पक्षक्षेष्ठीच्या आदेशानुसार मी सव्वा वर्षातच राजीनामा दिला असल्याचे सांगितले. पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले. अनेक नागरिकांच्या समस्या गेल्या सव्वा वर्षात सोडविण्यासाठी प्रयत्न केला. 

पंचायत समिती निवडणुकीत अकरापैकी शिवसेनेला नऊ, काँग्रेसला दोन, तर भाजपला एक जागा मिळाली होती. त्यावेळी पंचायत समिती सभापतीपदाचा मान जया खंडारे आणि प्रतिमाताई वानखेडे यांना देण्यात आला होता. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर खासदार जाधव यांनी सभापतिपदाची माळ निंबाजी पांडव यांच्या गळ्यात घातली होती.

शिवसेनेकडून नऊपैकी दोन महिला व एक पुरुष यांनी सभापतिपदाचा कारभार बघितला आहे.  आता मात्र सव्वा वर्षांच्या साठी अनेक पंचायत समिती सदस्य आप आपल्यापरीने पक्षश्रेष्ठींकडे सभापती पद मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सौ मस्के यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, निर्णय खासदार जाधव आणि आमदार रायमुलकर घेणार आहेत.

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com