मलकापूरच्या नगराध्यक्षांना दंगल प्रकरणी अटक - Malkapur Nagar Parishad President Harish Rawal Arrested for riots | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मलकापूरच्या नगराध्यक्षांना दंगल प्रकरणी अटक

संजय जाधव
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

गेल्या सोमवारी मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्या घराजवळ झालेल्या मारामारी प्रकरणात रावळ यांच्यासह पंचवीस जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात  रावळांसह  सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य संशयित फरारी आहेत

बुलडाणा : गेल्या सोमवारी मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्या घराजवळ झालेल्या मारामारी प्रकरणात रावळ यांच्यासह पंचवीस जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात  रावळांसह  सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य संशयित फरारी आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका व्यक्तीने दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करून घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यास नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांच्यासह पंचवीस लोकांनी त्यास बेदम मारहाण केली होती. त्यावेळी बेकायदेशीररित्या जमाव जमवून पोलिसांचा आदेश धुडकाविल्या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. शिवाजी नगर येथील किरण साळुंके १७ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता दारूच्या नशेत हरीश रावळ यांच्या घरी आला व अश्लील घाणेरडी शिवीगाळ करू लागला. त्यावेळी त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला तरी सुध्दा तो शिवीगाळ करून , धमक्या देवून घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला हरीश रावळ , प्रमोद उज्जैनकर , निरंजन लेले , संतोष उज्जैनकर यांचेसह पंचविस लोकांनी लाठया काठयांनी बेदम मारहाण केली.

त्यावेळी पोलिस समोर असताना पोलिसांचेही काही न ऐकता बेकायदेशीर पणे जमाव जमवून हा प्रकार चालू राहिला. या मारहाणीत किरण साळुंके जखमी झाला. त्याने शहर पोलिस स्टेशन दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस स्टेशनने गुन्हा रजि. नं . ६२ ९ / २०२० कलम ३२४ , ३२३ , १४३ , १४७ , १४ ९ , २६ ९ , २७० , १८८ , ५०४ , ५०६ भा.दं.वि तसेच कलम १३५ मुंबई पोलिस कायदा अन्वये हरीश रावळ यांच्यासह इतर पंचवीस लोकांवर दंगल करून बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यांच्या आधारे नगराध्यक्ष हरीश रावळांसह सहा जणांना आज सकाळी ११ वाजता अटक करण्यात आली आहे.  पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक कैलास नागरे करीत आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख