वाढत्या कोरोनामुळे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन - Lockdown once again in these districts of the state due to rising corona | Politics Marathi News - Sarkarnama

वाढत्या कोरोनामुळे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि नागरिकांचा बेजबाबरपणा यामुळे ओढावलेले संकट पाहता अखेर अमरावती विभागामध्ये पुढील आठवड्याभरासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि नागरिकांचा बेजबाबरपणा यामुळे ओढावलेले संकट पाहता अखेर अमरावती विभागामध्ये पुढील आठवड्याभरासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सोमवार (ता. २२ फेब्रुवारी) रात्री 8 वाजल्यापासून कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्याच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. रविवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी अमरावतीमध्ये १ हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि सर्वांनाच धडकी भरली. कोरोना नेमका किती वेगाने फैलावत आहे, याचा स्पष्ट अंदाज हे आकडे पाहून आला. परिणामी सुरुवातीला फक्त काही तासांपुरताच सीमित ठेवण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय थेट पुढील आठवड्याभरापर्यंत कायम ठेवण्यात आला. प्रशासनाच्या या निर्णयाअंतर्गत काही नवे निर्देशही देण्यात आले. 

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांना कोरोना

विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) दृष्टीने कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत.

सर्व प्रकारची दुकाने/ आस्थापने सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळ सुरु राहतील.
सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहणार आहे.
लग्नसमारंभकरिता फक्त २५ व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील.
जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहणार आहे. 
धार्मिक स्थळे ही एका वेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील.

संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग बंद राहतील.
अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणेही बंद राहतील सध्याच्या घडीला आयुक्तांनी असे निर्देश दिले आहेत.  

विभागीय आयुक्त यांनी जारी केलेल्या नवीन नियमावली नुसार कंटेंटमेंट झोन जाहीर केले आहेत. त्यानुसार अकोला शहर, मूर्तिजापूर आणि अकोट हे संपूर्ण कंटेंटमेंट झोन जाहीर करून उद्यापासून या ठिकाणच्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असणार आहे. या ठिकाणी २३ मार्च ते १ एप्रिल पर्यन्त संपूर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली असल्याचे अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉक डाऊन होत आहे.  

राष्ट्रवादीला १५ जागा मिळतील असा अंदाज होता, पण....?
 

विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी लॉक डाऊन जाहीर केला आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी सदर आदेशाला जिल्ह्यासाठी लागू केले असून आता सर्व दुकाने, आस्थापना यांची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी करण्यात आली आहे. हा आदेश १ मार्च पर्यंत लागू राहील, असे जिल्हाधिकारी रामामूर्ति यानी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. 

विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे विभागातील आदेश हे वाशिम जिल्ह्यासाठी लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुन्हा एका लॅाकडाऊन करण्यात येणार आहे. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख