खामगाव चे माजी आमदार माणिकराव गावंडे यांचे निधन - Former MLA of Khamgaon Manikrao Gawande passed away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

खामगाव चे माजी आमदार माणिकराव गावंडे यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 मार्च 2021

खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकरावजी प्रल्हादराव गावंडे यांचे आज गुरुवार (ता. 4 मार्च) रात्री 12.30 वाजता निधन झाले.

बुलडाणा : खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकरावजी प्रल्हादराव गावंडे यांचे आज गुरुवार (ता. 4 मार्च) रात्री 12.30 वाजता निधन झाले.

माणिकराव उर्फ नानासाहेब गावंडे 1972 ते 1978 तसेच 1985 ते 1990 या कालावधीत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. राज्य निवड मंडळाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भुषविले होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्यावर आज गुरुवार (ता. 4 मार्च) सकाळी 11 वा त्यांचे मुळगाव बोथाकाजी ता. खामगांव येथे अत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

हे ही वाचा....

पूजाचा मोबाईल व लॅपटाॅप भाजप नगरसेवकाने चोरला : पोलिसांकडे तक्रार

बीड : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. पूजाच्या आईवडिलांनी शांताबाई राठोड या कथित नातेवाईकाच्या विरोधात तक्रार केली. त्याविरोधात शांताबाई यांनी आपल्याला चव्हाण कुटुंबियांकडून जिवाचा धोका असल्याची तक्रार दिली. त्याच्यापुढे आता बंजारा समाजाची बदनामी केल्याबद्दल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरोधात शिवसेना उतरली असून बीड जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण यांनी केला आहे.

तामिळनाडूत राजकीय भूकंप : शशिकलांची राजकारणासह सार्वजनिक जीवनातून तडकाफडकी निवृत्ती

 

संगिता चव्हाण या एवढ्यावरच थांबल्या नसून पूजा चव्हाण हिचा मोबाईल व लॅपटाॅप हा भाजपचे पुण्यातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी चोरला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पूजा चव्हाण हिचा पुण्यातील वानवडी परिसरातील इमारतीवून पडून मृत्यू झाला. घोगरे याच भागातील भाजपचे नगरसेवक आहेत.  

संगिता चव्हाण याबाबत म्हणाल्या की  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून,चित्रा वाघ यांनी बंजारा समाजाची बदनामी होईल, असं वक्तव्य अनेक वेळा केले आहे. त्यामुळं बंजारा समाजाची नाहक बदनामी झाली.  पूजाच्या मृत्यूनंतर भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी, पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरला आहे. त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील फोटो हे स्वतःच्या स्वार्थासाठी चित्रा वाघ आणि धनराज घोगरे मीडियाला देत आहेत. त्यामुळे तात्काळ दोघांवर गुन्हा दाखल करावा.  बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे.

बीड जिल्हा बॅंकेचा वाद राज्यपालांच्या दारात 
 

याबाबत घोगरे यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांना वारंवार दूरध्वनी केला असता त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांची बाजू कळताच ती बातमीत समाविष्ट करण्यात येईल.

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला असून तो राजीनामा अद्याप राज्यपालांकडे दिला नसल्याबद्दल भाजपने यावर टीका केली. या प्रकरणात पोलिसांनी काहीच तपास केल्या नसल्याबद्दलही भाजप सरकारला लक्ष्य करत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजत आहे. पूजा चव्हाणच्या घरच्यांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये दिल्याचा आरोप शांताबाई राठोड यांनी करून खळबळ उडवून दिली होती. दुसरीकडे आमच्या मुलीची बदनामी होत असून शांताबाईंशी आपला संबंध नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख