शिवमुद्रेवरुन काँग्रेस व शिवसेना आमदारात कलगीतुरा - Dispute between Shiv Sena and BJP MLAs over installation of statues | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

शिवमुद्रेवरुन काँग्रेस व शिवसेना आमदारात कलगीतुरा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 मार्च 2021

जिल्हा परिषदेने बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात अनेख वर्षापासून पुतळे बसविन्यासाठी जागा दिली आहे.

बुलडाणा : 'शिवमुद्रेवर स्वराज्य चालायचे पण आता देश चालू शकत नाही. देश संविधानावर चालतो या शिवसेनेना आमदार संजय गायकवाड यांच्या भूमिकेमुळे बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना आमदारात कलगीतुरा रंगल्याच चित्र आहे. जिल्हा परिषदेने बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात अनेख वर्षापासून पुतळे बसविन्यासाठी जागा दिली आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या जागेवर शिवरायांची स्वराज्य ओळख असलेली भव्य शिवमुद्रा, मशाल व संविधानाची मोठी प्रतिकृति बसविली आहे.

त्यावर आक्षेप घेत सध्याचे शिवसेना आमदार व 2018 मध्ये नगर परिषदेचे नगरसेवक संजय गायकवाड यांनी नगर परिषदेत ठराव घेऊन शिवमुद्रा व इतर प्रतिकृति काढून भव्य पुतळा बसविन्याचा आग्रह केला होता. या ठरावावर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकार्याना अपील करून, यात शिवमुद्रेबाबत ठरावात अवमानना केल्याचा आक्षेप घेतला. यामुळे विद्यमान शिवसेना आमदार व काँग्रेसचे माजी  आमदारात यांच्यात शिवमुद्रेवरुन वाकयुद्ध रंगल्याने जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : लोकसभेला लयं जणांनी माझी मज्जा केलीय, त्याचे उट्टे काढण्यासाठीच मी आलोय!

गायकवाड हे आपल्या शिवमुद्रेच्या ठरावाबाबत ठाम असून माजी आमदार हे निजामाचे वंशज असल्याचे त्यांनी म्हटल आहे. तर शिवमुद्रेचा अवमान कदापी सहन करणार नसल्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी म्हटले आहे.   
 
बुलडाणा शहराचे वैभव समजल्या जाणाऱ्या जयस्तंभ चौकाजवळ असलेली जिल्हा परिषदेची जागा 2014 मध्ये नगर परिषदेला पुतळे बसविन्यासाठी हस्तांतरित केली होती. त्या जागेवरील जुने पुतळे काढून तात्कालीन काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी भव्य शिवमुद्रा, एक मशाल व भारताचे संविधान लेख शिल्प बसविल आहे. त्यावेळेस नगर परिषदेत 2018 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक असलेले व आताचे शिवसेना आमदार यांनी ठराव संमत करून या शिल्पावर अक्षेप घेतला. 

हे ही वाचा : तर राज्याल लॅाकडाउनशिवाय पर्याय नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
 

शिवमुद्रेवर स्वराज्य चालायचे पण, आता देश चालू शकत नाही. अशी भूमिका घेऊन हे शिल्प काढून तेथे शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचा घाट घातला. या ठरावाला काँग्रेसच्या माजी आमदारांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे अपील करत या ठरावात शिवमुद्रेचा अवमान झाल्याच्या आरोप केला. आता जिल्हाधिकार्यानी या केसची सुनावनी हाती घेतल्याने या आजी व माजी आमदारांच वाकयुद्ध समोर आले आहे.   
        
याबाबत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, शिवमुद्रेच्या धोरणावर ठाम असून उलट माजी आमदार हे निजमाचे वंशज असून त्यांचा शिवरायांच्या पुतल्याला विरोध स्वाभाविक आहे, अशी टीका केली.    

आता या कलगी तुर्यात भाजप ने ही उडी घेतली असून शिवमुद्रेचा अवमान करणाऱ्यां ठरावाचा भाजप तर्फे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी निषेध केला. हा हिंदवी स्वराज्याचा अपमान नगर परिषदेने केला, असल्याचे ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख