सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ येथे मनकर्णाबाई मोगल यांच्या द्वितीय स्मृर्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे आले असतात त्यांनी स्थानीक वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत फोटो सेशन केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आज पर्यंत कोणत्याही मंत्र्यानी वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत फोटोसेशन केले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भुमरे यांच्याबद्दल आपलेपणाची भावना निर्माण झाली. त्यामुळे या फोटोसेशनची चर्चा जिल्हाभरात रंगली.
पूजा चव्हाण प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडेंची उडी!
यावेळी भुमरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसोबत चर्चा केले व विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अधिकार्यांना सुचना दिल्या. भुमरे म्हणाले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अडचणी समजून घ्याव्यात. फलोत्पादन, रोजगार हमी विभागांच्या योजना सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
विविध योजनांची माहिती योजनांची माहिती देताना भुमरे म्हणाले की, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत या प्रकल्पात अनुदानाची टक्केवारी जवळपास ६५ ते १०० टक्के आहे. त्यामध्ये फळबाग लागवड, सदन फळबाग लागवड , शेडनेट गृह, पॉली हाऊस, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, अस्तरीकरण, प्लास्टिक मल्चिंग, फलोत्पादन यांत्रिकीकरण, शेडनेटमध्ये लागवड साहित्य यासह अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःची उन्नती साधता येईल असे भुमरे यांनी सांगितले.
वारकर्यांना मठाबाहेर काढू नका; अन्यथा...
यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सतीश तायडे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजू काका शेळके, भीमराव डोंगरे, वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सरपंच जनार्धन मोगल, सुभाष मोगल मंत्रालय विशेष कार्यकारी अधिकारी सुरेश मोगल, मंत्रालय विशेष कार्यकारी अधिकारी सतिश मोगल, मंत्रालय विशेष कार्य अधिकारी विवेक मोगल, तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, नायब तहसीलदार प्रवीण लटके ठाणेदार सोमनाथ पवार आदी उपस्थित होते.
Edited By - Amol Jaybhaye

