उद्या भाजप गायकवाडांना धडा शिकवणार!

बुलडाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती.
 Vijayraj Shinde, Sanjay Gaikwad .jpg
Vijayraj Shinde, Sanjay Gaikwad .jpg

बुलडणा :  बुलडाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती. जर मला कोरोनाचा जंतू सापडला असता तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबला असता! अशी मुक्तफळे त्यांनी उधळली होती.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा नाहीतर, उद्या भाजपचे कार्यकर्ते त्यांना सबक शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दिला.  

शिंदे म्हणाले, एका आमदाराने अशी भाषा वापरणे योग्य नाही. राज्यातील भाजपच्या नेत्यांवर अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. त्यांनी अशा शब्दात टीका करुन त्यांच्या बुद्धीचे दर्शन महाराष्ट्राला घडवले आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध व धिक्कार करतो असे शिंदे म्हणाले. पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली पाहिजे. त्यांना अटक झाली नाही तर भाजर त्यांना धडा शिकवेल, आणि त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची आणि पोलिसांनी असेल, असेही शिंदे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना चांगल्या भाषेत बोलायला शिकवले पाहिजे, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार गायकवाड यांना चिमटा घेत शिंदे म्हणाले की, भाजपच्याच भरवश्यावर हे आमदार आणि खासदार झाले आहे. कारण भाजप नव्हती म्हणून गायकवाड हे नगराध्यक्ष होऊ शकले नाही, आणि या जिल्ह्याचे खासदार स्वतःचा मुलगा सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आणू शकले नाही, हे यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. व भाजपचे आभार व्यक्त केले पाहिजे. 

आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार शिंदे हे राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी आहेत. नेहमीच एकमेकांना धमक्या देत असतात. मात्र, प्रत्येक्षात ह्या धमक्या फक्त इशाऱ्यापुरत्याच मर्यादीत राहतात. आज देण्यात आलेली धमकी हि फक्त इशाऱ्यापुरती राहते का? हे आता उद्याच समजणार आहे.

आमदार गायकवाड काय म्हणाले होते...

फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतीय जनता पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला होता. तसेच यावेळी त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

महाराष्ट्रात कोरोना साथीचा कहर सुरु आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपाची मंडळी खिल्ली उडवीत आहे. भाजपच्या लोकांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. असा आरोप गायकवाड यांनी केला होता. राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला रेमडेसिव्हिर इंजेक्शन मोफत वाटले. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला गायकवाड यांनी फडणवीसांना लगावला होता.

जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपला केले होते. ज्याचा घरातील माणूस कोरोनाने मरतो त्यालाच माहित कि कोरोना काय आहे. मात्र भाजपवाल्यांना याची जाण नाही. तसेच कोरोनाचे जंतू जर मला मिळाले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते अशी मुक्तफळे गायकवाड यांनी उधळली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com