शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वाहन पेटवून हल्ल्याचा प्रयत्न...

ईनोवा गाडीवर पेट्रोल टाकून स्फोट करुन, घरावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न आज मंगळवार 26 मेला पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडला आहे.
Attempt to set fire to MLA Sanjay Gaikwad's car .jpg
Attempt to set fire to MLA Sanjay Gaikwad's car .jpg

बुलडाणा : मागील अनेक दिवसापासून विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या ईनोवा गाडीवर पेट्रोल टाकून स्फोट करुन, घरावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न आज मंगळवार 26 मेला पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडला आहे. (Attempt to set fire to MLA Sanjay Gaikwad's car)

संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते, रात्री दीड वाजता ते घरी परतले होते. त्यानंतर 3 वाजेच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन पेट्रोल टाकून ईनोवा गाडी पेटवून दिली. त्या गाडीच्या जवळ 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या, एक गाडी पेटली तर सर्व वाहने पेटतील आणि गायकवाड यांच्या घर क्षतिग्रस्त होऊन परिवाराला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप होत आहे. 

दरम्यान, हा हल्ला करतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी तोडला होता, असाही कयास व्यक्त होत आहे. या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी शोध सुरू केला आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याशी संपर्क साधला असून, ही घटना जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही गंभीरतेने घेतली आहे. 

दरम्यान, कोरोना काळात उपास-तापास करू नका. आता तुमच्या कामात देवही येणार नाही. कारण की देवाने आपला दरवाजा बंद केलेला आहे. म्हणून मांसाहार करा, असे आवाहन आमदार गायकवाड त्यांनी जाहीरपणे केले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर गायकवाड यांनी  स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटर मधील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी व बॉईल अंड्यांच्या आहाराचे वाटप केले होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांन विषयी ही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर बुलडाण्यामध्ये भाजव व शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com