मी १० हजारांची फौज घेऊन येतो अन् सगळ्यांना सरळ करतो; संजय गायकवाड पुन्हा वादात

गायकवाड यांनी खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर या गावातील दोन समाजातील कौटुंबिक वाद झालेल्या कुटुंबाला बुधवारी भेट दिली.
 Sanjay Gaikwad .jpg
Sanjay Gaikwad .jpg

बुलडाणा : बुलडाणा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नियमीत चर्चेत असतात. त्यातच त्यांनी पुन्हा एकदा ऍट्रॉसिटी काद्यबद्दल वादग्रस्त विधान करुन, विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी ऍट्रॉसिटी बाबत धक्कादायक वक्तव्य केल्याचा एक व्हीडिओ नुकताच समोर आला आहे.  (Another controversial video of Shiv Sena MLA Sanjay Gaikwad goes viral)

गायकवाड यांनी खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर या गावातील दोन समाजातील कौटुंबिक वाद झालेल्या कुटुंबाला बुधवारी भेट दिली. दोन कुटुंबात आपसी वाद निर्माण झाला होता. या वादात गावातील घर व वाहनांची जाळपोळ व तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे पीडित वाघ कुटुंबियांना भेट देण्यासाठी गायकवाड यांनी शेकडो समर्थकांनसह गाड्यांच्या ताफ्या सोबत भेट देऊन परिस्थितिची पाहणी केली. मात्र, यांनतर त्यांनी तेथील गावकऱ्यांशी बोलतांना वादग्रस्त व चिथावणीखोर विधान केले. 

यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले की, या गावामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशला लाजवेल अशा प्रकारचा हल्ला झाला आहे. मला मातोश्रीवरून फोन आला की गावामध्ये जा आणि तेथील लोकांना धीर द्या. म्हणून मी इथे आलो आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी देखील पोलिसांशी चर्चा केली आहे. ऍट्रॉसिटी हा कायदा रक्षणासाठी आहे. मात्र, अनेक ठिकाणी पैसे वसुल करण्यासाठी आणि धमकी देण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांना असा समाज अपेक्षीत नव्हता. 

विनाकारण ऍट्रॉसिटीची केस दाखल केली तर तुम्हीही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करा. घराच्या आणि जमिनीच्या वादात ऍट्रॉसिटीची केस होत नाही. हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. जर विनाकारण कोणी वाद निर्माण करत असेल तर मी १० हजारांची फौज घेऊन येतो आणि सगळ्यांना सरळ करतो. मला सांगा मी सगळीच ताकद द्यायला तयार आहे. माझ्याकडे अस्त्र शस्त्रांची ताकद आहे. सगळ्यांनी व्यवस्थीत रहा, कोणावर अन्या करुन नका पण, अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्या, असे गायकवाड म्हणाले आहेत.  

आमदार संजय गायकवाड यांच्या गाव भेटीनंतर लगेच पुणे येथील ऑल इंडिया दलीत पँथर सेनेचे संयोजक दीपक केदारे यांनी सादर गावाला भेट देऊन खामगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्याचे खासदार आणि तिन्ही आमदारांविरोधात गंभीर आरोप करीत आमदार संजय गायकवाड यांना आव्हान दिले.  

केदारे म्हणाले, आमदार संजय गायकवाड यांनी आमचा इतिहास वाचला नाही वाटते, भीमा कोरेगांवचा इतिहास वाचून घ्या. अश्या धमक्याणा घाबरणार नाही. 10 हजार फौज शिवाजीपार्क वर घेऊन या, मी फक्त 500 लोक घेऊन येतो. पुन्हा एकदा भीमा कोरेगांव घडवून टाकू. असा इशारा केदारे यानी दिला.     

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com