तलाठ्याची तहसील कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती असी की नांदुरा तहसीलमध्ये अधिनस्त असलेले तलाठी अनिल अंभोरे हे सकाळी तहसील कार्यालयात पोहचले.
 Anil Ambhore commits suicide by hanging himself in tehsil office .jpg
Anil Ambhore commits suicide by hanging himself in tehsil office .jpg

नांदुरा (जि. बुलडाणा) : नांदुरा येथील तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अनिल अंभोरे नामक इसमाने तहसीलचे कार्यालयाच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (ता. १५ एप्रिल) सकाळी ९ वाजेदरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती असी की नांदुरा तहसीलमध्ये अधिनस्त असलेले तलाठी अनिल अंभोरे हे सकाळी तहसील कार्यालयात पोहचले. यावेळी सफाई कर्मचारी सफाईचे काम करण्यात व्यस्त असतांना अभोरे यांनी तहसीलदार यांचे मुख्य केबिनमधील बाथरूममध्ये प्रवेश केला. सोबत आणलेली दोरी खिडकीस बांधली व स्वतःच गळफास घेऊन आत्महत्या केली. तलाठी अंभोरे यांनी तसहिल कार्यालयात आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार राहुल तायडे यांनी घटनास्थळ असलेले बाथरूमचे निरीक्षण करून पोलिस प्रशासनाला सूचित केले. मयत तलाठी हे गेल्या १ वर्षांपासून कार्यालयीन कामे करीत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शेवटी त्यांनी स्वतःच्या लहरीपणामुळे जीवनयात्रा संपविले असल्याचे बोलले जात आहे. तलाठी अंभोरे यांचे मूळ गाव घाटबोरी तालुका मेहकर असून ते काही दिवसांपासून नांदुरा येथे भाड्याची खोली करून राहत होते.

घटनेचे वृत्त समजताच तलाठी यांची पत्नी व दोन मुलांनी तहसील कार्यालय गाठले असता त्यांचा शोक अनावर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे ही वाचा...

अंत्यविधि कार्यक्रमात सामील झालेल्या 300 लोकांपैकी 105 पॉझिटिव्ह; बाकी गावातून फरार...

जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पोटा गावात कोरोनाबाधित रुग्णांचा अंत्यसंस्कारात सामिल झालेल्या 300 गावकऱ्यांपैकी 105 जनाना कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पोटा या गावाची लोकसंख्या जेमतेम 700 आहे. पोटा या गावात कोरोनाबाधित पहिल्या रुग्णाचा मृत्यु काही दिवसांपूर्वी झाला होता त्यांच्या अंत्ययात्रेत गावातील अनेख नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर आरोग्य प्रशासनाकडून व तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांने गावातील नागरिकांच्या तक्रारिची दखल न घेतल्याने या गावात कोरोनाचा उद्रेक झाला असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला होता.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभारात 676 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर 346 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. उपचारार दरम्यान दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  त्याचप्रमाणे आजपर्यंत 42122 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 48 हजार 122 जणांना कोरोनाची लागण झाली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com