जिल्हा बॅंक संचालकपदाचे अनेकांचे स्वप्न भंगणार

बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सहकार विभागाकडून जाहीर झाल्यानंतर बॅंकेत निवडणुकीच्या राजकीय धूमशानला सुरुवात झाली आहे.
 Amravati District Bank election announced .jpg
Amravati District Bank election announced .jpg

अमरावती : जिल्ह्यातील सहकारक्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत चार संचालकपदांना कात्री लागली आहे. 25 ऐवजी आता जिल्हा बॅंकेत 21 संचालक राहणार असणार आहेत. बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सहकार विभागाकडून जाहीर झाल्यानंतर बॅंकेत निवडणुकीच्या राजकीय धूमशानला सुरुवात झाली आहे. जिल्हा बॅंकेत सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत 25 सदस्यीय संचालक मंडळ आहे. मात्र केंद्राकडून करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनंतर सहकार विभागाकडून त्याला कात्री लावण्यात आली असून संचालकपदांची संख्या कमी करण्यात आली. त्यानुसार आता 14 तालुके मिळून 14, राखीव 5 तसेच जुने चार मतदारसंघ गोठवून त्याचे दोन मतदारसंघ करण्यात आले आहेत. त्यामुळे आता 21 चे संचालक मंडळ राहणार आहे. पर्यायाने सहकार क्षेत्रातील काही धूरंधरांना यंदा मैदानातून माघार घ्यावी लागणार, असल्याचे संकेत मिळत आहेत. 

प्रशासकांच्या नियुक्तीनंतर जिल्हा बॅंकेत मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. केंद्राकडून करण्यात आलेल्या 97 व्या घटनादुरुस्तीनंतर संचालक मंडळाची संख्या 21 करण्यात आली आहे. 14 तालुक्‍यांतून 14, राखीव पाच (त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती एक, ओबीसी एक, भटक्‍या व विमुक्त जमाती एक, महिला दोन) राहणार आहेत. चार मतदारसंघ गोठवून त्याचे दोन मतदारसंघ तयार करण्यात आले. दुग्धविकास, कुक्कुटपालन व पशुपैदास मतदारसंघ तसेच खरेदीविक्री संघ, व्यक्तिगत भागीदार या दोन मतदारसंघांना मिळून एक तयार करण्यात आला आहे. 

नागरी सहकारी पतसंस्था तसेच ग्रामीण बिगर शेती व पगारदार सहकारी संस्था या दोन मतदारसंघांचा एक मतदारसंघ राहणार आहे. त्यामुळे चार संचालकांचे निर्वाचनक्षेत्र रद्द होतील. अमरावती जिल्हा कृषी औद्योगिक, सूतगिरणी, विपणन मतदारसंघ, नागरी बॅंक व पगारदार पतसंस्था मतदारसंघ, औद्योगिक बुनकर बलुतेदार, मजूर, ठेकेदारी संस्था व शेती संस्था मतदारसंघ तसेच व्यक्तिगत भागधारकांचा मतदारसंघ या चार मतदारसंघांना गोठवून नवीन दोन मतदारसंघ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा संचालकपदासाठी प्रयत्न करणाऱ्या काही राजकीय धुरिणांना थांबावे लागणार आहे.
 
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

सदस्य संस्थांकडून प्रस्ताव मागविणे : 26 एप्रिल ते 25 मे 
प्रारूप मतदारयादी तयार करणे : 31 मे 
मतदारयादी प्रसिद्ध करणे 4 जून 
मतदारयादीवर आक्षेप घेण्याची अखेरची तारीख : 4 जून ते 14 जून
आक्षेपांवर अंतिम निर्णय घेणे : 14 मे ते 24 जून  
अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे : 28 जून  

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com