अंत्यविधि कार्यक्रमात सामील झालेल्या 300 लोकांपैकी 105 पॉझिटिव्ह; बाकी गावातून फरार... - 105 corona positive in a single village in Buldana district | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

अंत्यविधि कार्यक्रमात सामील झालेल्या 300 लोकांपैकी 105 पॉझिटिव्ह; बाकी गावातून फरार...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

कोरोनाबाधित रुग्णांचा अंत्यसंस्कारात सामिल झालेल्या 300 गावकऱ्यांपैकी 105 जनाना कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पोटा गावात कोरोनाबाधित रुग्णांचा अंत्यसंस्कारात सामिल झालेल्या 300 गावकऱ्यांपैकी 105 जनाना कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पोटा या गावाची लोकसंख्या जेमतेम 700 आहे. पोटा या गावात कोरोनाबाधित पहिल्या रुग्णाचा मृत्यु काही दिवसांपूर्वी झाला होता त्यांच्या अंत्ययात्रेत गावातील अनेख नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर आरोग्य प्रशासनाकडून व तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांने गावातील नागरिकांच्या तक्रारिची दखल न घेतल्याने या गावात कोरोनाचा उद्रेक झाला असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. 

बाबरी प्रकरणी अडवानींसह ३२ जणांची मुक्तता करणारे न्यायाधीश निवृत्तीनंतर बनले लोकायुक्त 

आता हे संपूर्ण गाव प्रतिबंधित गाव म्हणून घोषित करण्यात आले असून मंगळवारी या संम्पूर्ण गावातील नागरिकांची तापासणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार राहुल तायडे यांनी दिली आहे. तसेच गावात आरोग्य कॅाम्प सुरु असून अंत्यविधि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पैकी 100 ते 150 लोक गावातून फरार झाले आहेत, एकमेकांच्या संपर्कात आलेल्याणि तात्काळ कोरोना चाचणी करुण घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आता गावात प्रवेशबंदीचा फलक गावाबाहेर लावला असून कोणालाही गावात प्रवेश नाही, अशी माहिती पोटा येथील सरपंचांनी दिली आहे.  

कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना सोडू नका
 

दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी 341 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारादरम्यान ३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच 863 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 46 हजार 530 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 40 हजार 795 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 5 हजार 426 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 309 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख