अकोल्यात शिवसैनिकांना आंदोलनादरम्यान धक्काबुक्की; ठाणेदार सक्तीच्या रजेवर

काल झालेल्या या आंदोलनानंतर जयहिंद चौकात वाहतूक कोंडी झाल्याने जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया व इतर शिवसैनिकांना रस्त्याच्या बाजूला येण्याची विनंती केली. त्यावर काही शिवसैनिकांनी आक्षेप घेतल्यानंतर घटनास्थळी पोलिस व शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. या प्रकरणी ठाणेदार पवार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जयहिंद चौकातून न हलण्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली. परिणामी घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Police Officer in Akola Sent on Leave After Shivsena Agitation
Police Officer in Akola Sent on Leave After Shivsena Agitation

अकोला : उत्तर प्रदेशामधील हाथरस गावातील पाशवी बलात्कार व हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी (ता. ३) दुपारी जुने शहरातील जयहिंद चौकात आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनानंतर पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्याने शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख व  इतर शिवसैनिकांनी जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश पवार यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी रात्री ९ वाजेपर्यंत जयहिंद चौकात ठिय्या दिला.

त्यामुळे संबंधित ठाणेदाराला सक्तीच्या रजेवर पाठवून या पुढे पोलिस मुख्यालयी काम करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिले. सदर आदेशानंतर आमदार बाजोरिया व शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. या प्रकरणी ठाणेदाराची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. 

काल झालेल्या या आंदोलनानंतर जयहिंद चौकात वाहतूक कोंडी झाल्याने जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया व इतर शिवसैनिकांना रस्त्याच्या बाजूला येण्याची विनंती केली. त्यावर काही शिवसैनिकांनी आक्षेप घेतल्यानंतर घटनास्थळी पोलिस व शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. या प्रकरणी ठाणेदार पवार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जयहिंद चौकातून न हलण्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली. परिणामी घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

यावेळी शिवसैनिकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यासह घोषणाबाजी सुद्धा केली. या प्रकरणातील दोषींवर व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने यावेळी केली. या आंदोलनात आमदार गोपोलिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, महिला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवणीकर यांच्यासह इतर शिवसैनिकांची उपस्थित होती.

वाहनांच्या रांगा व पोलिसांचा आक्षेप
शिवसैनिकांनी आंदोलनादरम्यान पुतळा दहन केल्यामुळे जयहिंद चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चारचाकीसह दोनचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. त्यांची प्रतिक्रिया आटोपल्यानंतर जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी सर्व शिवसैनिकांना रस्त्याच्या बाजूला होण्याची विनंती केली. त्यावर काही शिवसैनिकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पोलिस व शिवसैनिकांमध्ये शाब्दीक चकमकीसह धक्काबुक्की सुद्धा झाली. वाद वाढत असतानाच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी मध्यस्थी करत आमदार बाजोरियांसह इतरांना जयहिंद पोलिस चौकीत नेले. 

कारवाईसाठी आमदारांचा ठिय्या
पोलिस व शिवसैनिकांमध्ये झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया व आमदार नितीन देशमुख जयहिंद चौक पोलिस चौकीत पोहचले. यावेळी त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या प्रकाराची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिली. संबंधित ठाणेदारावर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत त्यांनी पोलिस चौकीतून जाण्यास नकार दिला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com