उजनीची मोहिम फत्ते करून धरण बचाव समितीने बांधली मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी वज्रमूठ!

तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीतरया योजनेची खिल्लीउडवली.
The Ujani Dam Rescue Committee will now fight for the water of Mangalvedha taluka
The Ujani Dam Rescue Committee will now fight for the water of Mangalvedha taluka

मंगळवेढा  ः उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात उजनी धरण बचाव समितीने महिनाभर विविध मार्गाने आंदोलन करून तो निर्णय सरकारला रद्द करण्यास भाग पाडले. त्याच उजनी धरण बचाव समितीने आता मंगळवेढ्यातील पाण्यासाठी नंदेश्वरात वज्रमूठ बांधली असून या पाण्यासाठी लढा देण्याचे ठरले आहे. (The Ujani Dam Rescue Committee will now fight for the water of Mangalvedha taluka)
           
लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत तालुक्यातील 35 गावांचा पाणीप्रश्न चर्चेला आला. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघात ही गावे येत असल्यामुळे हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेला गेला. त्यानंतर या प्रश्नात हात घालत सात महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत (स्व.) आमदार भारत भालके हे या गावातील आंदोलकांना हाताळण्यास यशस्वी झाले. त्यानंतर या पाण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सर्व्हे, पाणी उपलब्ध प्रमाणपत्र, अनुशेषाचा प्रश्न, यात बरीच वर्षे गेली.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 च्या अखेरीस मंगळवेढ्यातील 35 गावांसाठी दोन टीएमसी पाण्यासह 560 कोटी योजनेस प्रशासकीय मान्यता दिली. यामधील 11 गावे म्हैसाळ योजनेत समाविष्ट केली. मात्र, राज्यात राजकीय सत्ता बदल झाल्यानंतर भाजप सरकारने या योजनेचे पुनर्सर्वेक्षण केले. त्यात एक टीएमसी पाणी व गावांची संख्या कमी करून दाखल केलेला प्रस्ताव दोन त्रुटींसह परत आला. या गावाच्या पाण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आल्या होत्या. 

तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तर या योजनेची खिल्ली उडवली. त्यानंतर 2019 मधील विधानसभा निवडणुकीत राज्यात नाट्यमयरित्या सत्ता बदल होऊन (स्व.) आमदार भालके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून योजनेतील गावे व पाणी पूर्ववत ठेवण्यात यश मिळवले. पोटनिवडणुकीदरम्यान जलसंपदा मंत्री पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे या योजनेचे तालुक्यात सर्वेक्षण सुरू आहे.

ही सर्व परिस्थिती असतानच उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याबाबतचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला.यामध्ये विशेषतः पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा मोठा पुढाकार होता. परंतु त्यांच्या निर्णयाविरोधात उजनी धरण बचाव समितीच्या माध्यमातून लढा देण्यात आला. यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी या लढ्यामध्ये प्रभावी नेतृत्व केले. अशा परिस्थितीत उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर आज या समिती सदस्यांचा नंदेश्वर येथे सत्कार करण्यात आला.  

या सत्कारप्रसंगी मंगळवेढ्यातील पाण्यासाठीदेखील वज्रमूठ बांधण्याचे या वेळी ठरविण्यात आले. उजनी धरण बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, सचिव माऊली हळणवार, बापू मेटकरी, धनाजी गडदे, दीपक वाडदेकर, दीपक भोसले, नामदेव जानकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com