राजूबापू पाटील कुटुंबीयांची निष्ठा कायम लक्षात राहील : शरद पवार 

राजूबापू पाटील यांच्याविचाराने भविष्यातही काम करा, सगळ्यांशी मिळून राहा.
Loyalty of Rajubapu Patil family will always be remembered: Sharad Pawar
Loyalty of Rajubapu Patil family will always be remembered: Sharad Pawar

पंढरपूर : "यशवंतभाऊ आणि राजूबापू पाटील यांची गेल्या दोन पिढ्यांपासूनची निष्ठा आमच्या कायम लक्षात राहील. कुठलीही अडचण असल्यास हक्काने सांगा ती तत्काळ सोडवू,' असे अभिवचन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांत्वनपर भेटीत राजूबापू पाटील यांचे सुपुत्र गणेश पाटील यांना दिले. 

भोसे (ता. पंढरपूर) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, बंधू महेश पाटील व चुलते अनंतराव पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले. निधनानंतर आज (ता. 29 सप्टेंबर) पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

या वेळी त्यांच्याबरोबर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे, आमदार यशवंत माने उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,  सीईओ प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

राजूबापू पाटील यांच्या आठवणी सांगताना शरद पवार म्हणाले की, वीज व पाण्याचा प्रश्न त्यांनी अनेकवेळा माझ्याकडे मांडला. त्यांच्यामध्ये अतिशय जिद्द व चिकाटी होती. त्यांच्या विचाराने भविष्यातही काम करा, सगळ्यांशी मिळून राहा. कोणतीही अडचण आल्यास फोन करा किंवा समक्ष भेटा असे सांगत त्यांनी पाटील कुटुंबाला धीर दिला. 

या वेळी त्यांनी घरातील सर्व व्यक्तींच्या तब्येतीची चौकशी केली तसेच नवीन सुरू केलेल्या कारखान्याची परीस्थिती जाणून घेतली. उत्पादित मालाची बाजारपेठ, मिळणारा दर, रिकव्हरी आदींविषयी माहिती जाणून घेतली. 

या वेळी पाटील कुटुंबातील रावसाहेब पाटील, शेखर पाटील, शहाजीराव पाटील, धैर्यशील पाटील, अमर पाटील, प्रसाद पाटील, आशिष पाटील आदी उपस्थित होते. 


हेही वाचा : सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयने काय दिवे लावले? 

पंढरपूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर केंद्र सरकारचा विश्‍वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, सीबीआय) नेमली. त्या एजन्सीने आत्तापर्यंत काय दिवे लावलेत? असा प्रश्‍न करून या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या भाजपला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टोला लगावला. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपविण्यात यावा, या मागणीसाठी राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी रान उठविले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवून दीड महिना झाला तरी त्यांच्या हाती अद्याप ठोस काहीही लागलेले दिसत नाही. यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर शरद पवार यांनी वरील उत्तर दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com