आमदारकी गेली उडत, अगोदर शेतकऱ्यांच्या घामाचे दाम द्या... 

राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana will agitate for a one-time FRP
Swabhimani Shetkari Sanghatana will agitate for a one-time FRP

इस्लामपूर (जि. सांगली) : "आमदारकी गेली उडत, अगोदर शेतकऱ्यांच्या घामाचे दाम द्या,'' असा महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवत सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाची एकरकमी एफआरपी द्यावी. या मागणीसाठी 8 मार्च रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवर्तक ऍड. शमशुद्दीन संदे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. 

संदे म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी उसाची एकरकमी एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. त्याच प्रमाणे सांगली जिल्ह्यात अपेक्षा होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने कडेगाव येथे सर्व कारखानदारांची बैठक घेतली होती. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व करखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. जिल्ह्यातील फक्त सोनहिरा, उदगीर, दालमिया या तीन कारखान्यांनीच आजपर्यंत एकरकमी एफआरपी जमा केली आहे. उरलेल्या एकही कारखान्याने एकरकमी एफआरपी न देता त्याचे तुकडे करून रक्कम जमा केली आहे.'' 

"ऊस निमायक मंडळाच्या कायद्यानुसार उसाचे गाळप झाल्यापासून 15 दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम जमा करणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. असे असूनसुद्धा या कारखान्यांनी कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे उर्वरित बिले व्याजासह जमा करावीत. यापुढील काळात गाळपाला जाणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी 8 मार्चला सकाळी 11 राजारामनगर येथील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिषेक व होम हवन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे वेळेत द्यावेत, अशी सद्‌बुद्धी कारखानदारांना द्यावी, यासाठी बापूंच्या चरणी प्रार्थना करणार आहे. त्यानंतर जे. डी. लाड यांच्या, तसेच नागनाथ अण्णांच्या पुतळ्यालाही अभिषेक करण्यात येणार आहे,'' असे संदे यांनी सांगितले. 

आम्ही आमदारकीसाठी आंदोलन करीत नसून शेतकऱ्यांच्या घामाचा दाम मिळण्यासाठी आंदोलन करीत आहोत, असेही संदे यांनी नमूद केले. या वेळी राज्य कार्यकारिणीचे सदस्य आप्पासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, जिल्हा युवक अध्यक्ष भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, रमेश पाटील उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com